आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Papers Related To Coal Block Allocation That Are Not Traceable Will Be Located And Given To CBI Within Time Stipulated By SC Says Manmohan Singh

कोळसा घोटाळ्यातील फाईलींचा शोध सुरु, न सापडल्‍यास सीबीआय चौकशीः पंतप्रधान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कोळसा खाण वाटप गैरव्यवहार प्रकरणावरुन राज्‍यसभेत प्रचंड गदारोळ झाला. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी राज्‍यसभेत निवेदन देऊन सरकार सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या निर्देशांचे पालन करत असल्‍याचे सांगितले. गहाळ फाईल्‍स न सापडल्‍यास सीबीआयमार्फत चौकशी करण्‍यात येईल, असे आश्‍वासनही त्‍यांनी दिले. तरीही विरोधकांचे समाधान झाले नाही. अखेर कामकाज तहकूब करण्‍यात आले.

गहाळ फाईलींवरुन भारतीय जनता पक्षाच्‍या सदस्‍यांनी लोकसभा आणि राज्‍यसभेत गदारोळ घातला. कोळसा गैरव्यवहारावरून राज्यसभेत 'प्रधानमंत्री जवाब दो'च्या घोषणा विरोधी पक्षांकडून देण्यात आल्‍या. त्‍यामुळे दोन वेळा कामकाज तहकूब करण्‍यात आले होते. या मुद्यावरुन पंतप्रधनांनी राज्‍यसभेत स्पष्टीकरण दिले. त्‍यांनी सांगितले, 'गहाळ फाईली शोधण्यासाठी सरकारकडून कोणतेही प्रयत्न करण्यात येत नसल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाचे सरकारकडून पालन करण्यात येत आहे. सरकार कॅग आणि सीबीआयला पूर्णपणे सहकार्य करत आहे. सर्वोच्‍च न्‍यायालयाने ठरवून दिलेल्‍या वेळेत सर्व फाईली सीबीआयला सोपविण्‍यात येतील. गहाळ फाईली न सापडल्‍यास सीबीआयकडे चौकशी सोपविण्‍यात येईल, असे पंतप्रधान म्‍हणाले. पंतप्रधानांच्‍या निवेदनानंतरही विरोधकांचे समाधान झाले नाही. गदारोळ सुरुच राहिल्‍यामुळे कामकाज तहकूब करण्‍यात आले.