आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Parties Rountable Meeting Summoned, Demand By BJP

चीनच्या घुसखोरीबाबत चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा, भाजपची मागणी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लडाखमधील चिनी घुसखोरीचा मुद्दा तापू लागला आहे. सरकार काहीतरी लपवत असल्याचा आरोप करत या मुद्द्यावर चर्चेसाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी भाजपने केली आहे.


चीनने ताज्या घुसखोरीचे समर्थन केले असून जोपर्यंत अंतिम निर्णय होत नाही, तोपर्यंत आम्ही आमच्या प्रदेशात गस्त घालतच राहणार असल्याचे म्हटले आहे. सीमेवर पायाभूत सुविधांचे बांधकाम बंद करण्याचा प्रस्तावही चीनने ठेवला आहे. भारताने तो फेटाळून लावला आहे. विशेष म्हणजे 17 जून रोजी चिनी सैनिकांनी लडाखच्या चुमार परिसरात घुसखोरी करून पक्के खंदक उद्ध्वस्त केले. भारतीय सैन्याने निगराणीसाठी लावलेल्या कॅमे-यांच्या तारा कापल्या आणि एक कॅमेराही ते सोबत घेऊन गेले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनइंग यांनी लडाखमधील चिनी घुसखोरी समर्थनीय ठरवली.


चीनच्या घुसखोरीची माहिती जनतेला का दिली जात नाही, ती मुद्दामहून का दडवून ठेवली जात आहे, ताज्या घुसखोरीनंतर सरकार चीनशी संबंधांचा पुनर्विचार करणार आहे का, हे भाजपला सरकारकडून जाणून घ्यायचे आहे, असे भाजपचे प्रवक्ते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.