आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • All Schools Should Tight Security, After Peshawar Attack Centre Give Order

दहशतवादी हल्ला झाल्यास शाळांनी घ्यावी खबरदारी! केंद्राचे निर्देश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पेशावरच्या लष्करी शाळेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. सर्व शाळांनी सुरक्षा व्यवस्था कडक करावी, असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व शाळांना काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या. त्यात आणीबीणीच्या परिस्थितीला तोंड द्यायला सज्ज राहावे, सीबीएसईमार्फत जारी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरची (एसओपी) कडक अंमलबजावणी करावी, असे सुचवले आहे. त्यात मॉक ड्रिल्स आणि सीसीटीव्ही लावणे या उपाययोजनांचा समावेश आहे.

मॉल्स, मल्टिप्लेक्स, हॉस्टेल आणि शाळा ही दहशतवाद्यांची सॉफ्ट टार्गेट आहेत, त्यामुळे ही मार्गदर्शिका जारी केल्याचे गृह मंत्रालयाचे म्हणणे आहे.

आणीबाणीच्या स्थितीत काय करावे?
१. शाळेत ये-जा करण्यासाठी किमान ३ गेट असावेत. गेटवर टेलिफोन सुविधा द्यावी.
२. सर्व गेटवर तीन-तीन सुरक्षा रक्षक असावेत. त्यांच्यात वॉकी-टॉकी कम्युनिकेशन असावे.
३. संरक्षक भिंती व आत सीसीटीव्ही लावावे. केंद्रीय उद‌्घोषणा, इशारा प्रणाली हवी.
४. शाळेत महत्त्वाच्या जागांवर पोलिस नियंत्रण कक्ष व स्थानिक पोलिस ठाण्याचे नंबर लिहावेत.
५. शाळा परिसरात उडी मारून येता येऊ नये म्हणून संरक्षक भिंतीवर लोखंडी जाळी लावावी.
६. अतिरेकी शाळेत घुसलेच तर दारात येऊ नये. दारे आतून बंद करावी. जमिनीवर झोपावे.

गोळीबार झाल्यास
शाळेजवळील रस्त्यावर अंदाधुंद गोळीबाराच्या घटनेत मुलांच्या येण्याच्या आणि जाण्याच्या वेळी मुख्य गेटवर दोन सुरक्षा रक्षक असावेत. मुख्य गेटवरील रक्षकाने मुलांना आत घ्यावे,गेट बंद करावे. बस, रिक्षातून मुले उतरली नसतील तर वाहनांना परिसरातून त्वरित बाहेर काढावे.