आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोनसह सर्व सेवा अर्धा टक्का महाग, १५ नोव्हेंबरपासून ०.५% स्वच्छ भारत अधिभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - फोन बिल, वीज बिल, रेल्वे तीकिट, हॉटेलमधील जेवण हे सर्व पुन्हा एकदा महाग होणार आहे. येत्या १५ नोव्हेंबरपासून ०.५ टक्के या सर्व सेवांवर स्वच्छ भारत सेस म्हणजेच अधिभार लागणार आहे. म्हणजे १०० रुपयांवर ५० पैसे. सेवा कर लागू असलेल्या सर्व प्रकारच्या सेवांवर हा अधिभार लागणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्रालयाच्या अधिपत्याखालील केंद्रीय उत्पादन व सीमा शुल्क मंडळाने (सीबीईसी) शुक्रवारी याबाबतची अधिसूचना काढली आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी २०१५-१६ च्या अर्थसंकल्पात स्वच्छ भारत अधिभाराची तरतूद केली होती. मात्र तेव्हा कोणत्या सेवांवर किती अधिभार लावायचा हे निश्चित झाले नव्हते. परंतु मंजूर झालेल्या वित्तीय विधेयकात सरकारला सर्व प्रकारच्या सेवांवर दोन टक्क्यांपर्यंत अधिभार लावण्याचा अधिकार मिळाला होता. या अधिभारातून गोळा झालेली रक्कम स्वच्छ भारत अभियानावर खर्च केली जाणार आहे.

हा स्वच्छ भारत अधिभार १४ टक्के सेवा कराव्यतिरिक्त असेल. या अधिभारातून चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या तिजोरीत सुमारे ४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल गोळा होण्याची शक्यता आहे.

केंद्राने या अधिभाराचे समर्थनही केले आहे. स्वच्छ भारत अधिभार हा वेगळा कर नसून देशातील प्रत्येक माणसाचे या मोहिमेत योगदान असावे म्हणून हे योगदान आकाराण्यात आले असल्याचे सीबीईसीने जारी केलेल्या अधिसूचनेत स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...