आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • All States Aap Party Activist In Delhi Election Camping

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पंजाब राज्यातील कार्यकर्ते 'आप'च्या प्रचारात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत महाराष्ट्राचेही मोठे योगदान ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रातील सर्वच मंत्री आणि १२० खासदारांना प्रचारात उतरविले आहे. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी केजरीवाल यांनी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यांतून हजारो कार्यकर्त्यांना आमंत्रित केले आहे. महाराष्ट्रातून आलेले दीड हजार कार्यकर्ते आम आदमी पार्टीचा प्रचार करीत आहेत.

प्रजासत्ताक दिनाचा सोहळा आटोपताच दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलीच रंगत आणली आहे. दररोज आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना भाजप, आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तू तू – मै मै दिल्लीकर अनुभवत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी केंद्रातील सर्वच मंत्र्यांना प्रचाराच्या कामाला जुंपले आहे. शिवाय, १२० खासदारांना ७० मतदारसंघ वाटून देण्यात आले आहेत. भाजपकडे सक्षम यंत्रणा असली तरी आम आदमी पार्टीची कार्यकर्ते प्रत्येक दारात पोहोचत आहे.

येथील निवडणुकीचा संपूर्ण माहोल आम आदमी पार्टी आणि भाजप याच्या भोवतालीच फिरत असल्याचे दिसून येते. काँग्रेस २०१३ सारखीच प्रचारातही माघारली आहे. राहुल गांधी यांनी गुरुवारी केलेल्या सभेला मात्र बर्‍यापैकी गर्दी झाली होती. महाराष्ट्रातील कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने आले असून दोन दिवसांत पुन्हा शेकडो कार्यकर्ते येणार असल्याची माहिती अंजली दमानिया यांनी दिली.

दिग्गज नेत्यांच्या फौजा
महाराष्ट्रातून आम आदमीच्या प्रचारासाठी मयंक गांधी, अंजली दमानिया, सुभाष वारे, प्रीती मेनन, मारुती भापकर आदी सर्वच महत्त्वाचे नेते गेले आहेत. कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, मराठवाडा आणि विदर्भातील जवळपास दीड हजार कार्यकर्ते प्रचाराला लागले आहेत. आम आदमी पार्टीचे शिस्तबद्ध नियोजन आहे. या कार्यकर्त्यांना मतदारसंघनिहाय पाठविण्यात आले असून चार लाख मराठी मतदारांना ते लक्ष्य करीत आहेत. अनेक कार्यकर्ते बसमधून प्रचार करीत आहेत तर पथनाट्याचे प्रयोगही उत्साहाने पार पाडत आहेत.