आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संदीपकुमारवर महिलेकडून बलात्काराचा अारोप, म्हणे- कोल्ड ड्रिंकमध्ये मिसळले गुंगीचे औषध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आपचे बडतर्फ मंत्री संदीपकुमार आणखी संकटात सापडले आहेत. सीडीमध्ये त्यंाच्यासोबत दिसणाऱ्या महिलेने संदीपकुमारांवर बलात्काराचा आरोप केला. पेयामध्ये गुंगीचे औषध मिसळल्यानंतर मंत्र्याने बलात्कार केल्याचा महिलेचा आरोप आहे. यानंतर संदीपकुमार शनिवारी पोलिस उपायुक्तांच्या कार्यालयात शरण आले.

महिलेने संदीपकुमार यांच्याविरुद्ध सुलतानपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तिने तक्रारीत म्हटले की, संदीपकुमार मंत्री झाल्यानंतर सीडी बनवण्यात आली. शिधापत्रिका मिळवण्यास मदत मिळावी म्हणून मंत्र्यांच्या कार्यालयात गेले. त्या वेळी त्यांनी कोल्ड ड्रिंक देऊ केले. मात्र, त्यात गुंगीचे औषध होते. यानंतर शुद्ध हरवल्यानंतर माझ्यावर बलात्कार करण्यात आला. यादरम्यान सीडी बनवण्यात आल्याची माहिती नव्हती, असा दावा महिलेने केला आहे.पोलिस सहआयुक्त संजय सिंग म्हणाले, पीडितेचा जबाब नोंदवला जात आहे.

भ्रष्टाचाराचा गुन्हा शक्य
संदीपयांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपात गुन्हा दाखल होऊ शकतो. भाजप आमदार ओमप्रकाश शर्मा आरटीआय कार्यकर्ते विवेक गर्ग यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे भ्रष्टाचाराची तक्रार दिली. त्यात म्हटले , संदीप पत्नीसोबत २२ एप्रिल ते जुलै २०१६ २४ जून ते १० जुलैपर्यंत अमेरिकेत पत्नीवर उपचार केले. तेथील खर्च कोट्यवधी. त्यांनी निवडणुकीवेळी संपत्ती १३ लाख १६ हजार ६२९ रु. जाहीर केली . त्यामुळे मग उपचारावर एवढा खर्च कसा?

संदीपकुमार निलंबित
आमआदमी पार्टीने शनिवारी संदीप कुमार यांना निलंबित केले. संदीपकुमारांचे कृत्य चुकीचे असून त्यांच्याविरुद्ध त्यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून निलंबित केले आहे. प्रकरण शिस्तपालन समितीकडे सोपवण्यात आले असून त्यानंतर पक्ष निर्णय घेईल; परंतु त्याआधी शनिवारी सकाळी झालेल्या चर्चेअंती संदीप कुमार यांना निलंबित केल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी सांगितले. राजकीय समिती आपचा निर्णय घेणारी सर्वोच्च समिती आहे.
बातम्या आणखी आहेत...