आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्‍ली, मुंबईत ISIS चे सक्रिय सदस्‍य, अफशांने दिली पोलिसांना माहिती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - ISIS या क्रुर दहशतवादी संघटनेसाठी भारतात ऑनलाइलन भरती सुरू करण्‍याच्‍या आरोपाखाली अफशां जबीन या महिलेला पोलिसांनी अटक केली. दरम्‍यान, तिच्‍या चौकशीतून अनेक धक्‍कदायक खुलासे समोर आले असून, देशात सध्‍या ISIS चे नऊ सक्रिय सदस्‍य असून, ते दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बेंगलुरू या शहरासह कश्मीरमध्‍ये बसून संघटनेच्‍या विचारधारेचा प्रचार, प्रसार करत आहेत. तसेच आपण कोणाच्‍या प्रेरणेचे आयएसआयएस ज्वाइन केले, याची माहितीही तिने दिली असून, त्‍या व्‍यक्‍तींवर सुरक्षा संस्‍था लक्ष ठेवून आहे.
अफशांने नेमके काय सांगितले.
अफशांने काय सांगितले
>अफशांने आपल्‍या फेसबुक ग्रुप “Islam Vs Christianity, a friendly discussion” च्‍या सहा अॅडमिनिस्ट्रेटर आणि 14 सक्रिय सदस्‍यांची माहिती दिली आहे. त्‍यातील काही भारतात तर काही विदेशात आहेत.
> सक्रिय सदस्‍यांमध्‍ये मुंबईतील दोन लोक, दिल्लीचे दोन विद्यार्थी, बेंगलुरु आणि कश्मीरचे दोन-दोन लोक आहेत. मुंबईतील दोन व्‍यक्‍तींपैकी एक अलकायदाशी निगडित नुसरा फ्रंटचा समर्थक मानला जातो. यातील बेंगलुरूमधील एक सदस्‍य केमिकल इंजीनियरिंगची पदवी घेतलेला आहे. विशेष म्‍हणजे ग्रुपच्‍या अॅडमिनिस्ट्रेटरमध्‍ये मुंबईची एक महिलासुद्धा सहभागी आहे.
>अफशांने या व्‍यक्‍तींशिवाय ज्‍या व्‍यक्‍तींबद्दल सांगितले त्‍यामध्‍ये हसन अब्दुल घानी हा इराकच्‍या मोसुलमधील राहणारा आहे. तो आयएसआयएसचा दहतशतवादी आहे.

कोण आहे अफशां जबीन?
>38 वर्षीय अफशां हिला यूएईतून डिपोर्ट केले गेले होते. ती आयएसआयएसशी सक्र‍िय सदस्‍य असून, सध्‍या हैदराबाद पोलिसांच्‍या ताब्‍यात आहे.