आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपबरोबरची आघाडी तुटणार नाही - शरद यादव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षासोबत (भाजप) खूप जुनी आघाडी आहे आणि ती कायम राहणार असल्याचे संकेत शरद यादव यांनी रविवारी सांगितले. संयुक्त जनता दलाची नवी दिल्लीत झालेल्या दोन दिवसाच्या बैठकीत जेडीयूच्या राष्‍ट्रीय अध्‍यक्षपदी शरद यादव यांची तिस-यांदा पुर्ननिवड करण्‍यात आली. आमची आघाडी भाजपसोबत आहे आणि ती टिकून राहिल. प्रसारमाध्‍यमे जेडीयू आण‍ि भाजप यांच्यात मतभेद निर्माण करित असल्याचेही यादव यांनी सांगितले.

मोदींच्या नावाचा स्पष्ट उल्लेख न करता यादव म्हणाले की, आम्ही कोणत्याही व्यक्तीचा पंतप्रधान पदासाठी विरोध केला नाही. आम्ही एनडीएबरोबर गेल्या 17 वर्षांपासून आहोत आण‍ि यापुढे ही एकत्र राहु. समता पक्षात विलिन झाल्याने जेडीयूसमोर अनेक आव्हाने आहेत. पक्षाला ज्या ठिकाणी पोहोचायला हवे होते, तिथे तो पोहोचलेला नाही ,असे ते म्हणाले.