आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अझहर सह चौघांवर खटला भरण्यासाठी परवानगी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : पठाणकोटमधील हवाई दलाच्या तळावर २ जानेवारीला झालेल्या दहशतवादी हल्ला प्रकरणात जैश-ए-मोहंमदचा प्रमुख मौलाना मसूद अझहर आणि इतर तिघांच्या विरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) परवानगी दिली आहे. आता एनआयए लवकरच अझहर मसूद, त्याचा भाऊ रऊफ अशगर आणि चार दहशतवाद्यांचे हँडलर काशिफ जान आणि शाहिद लतीफ अशा चौघांवर आरोपपत्र दाखल करेल, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
गुरुदासपूरच्या बामियाल येथून भारतात घुसल्यानंतर चार दहशतवाद्यांनी पठाणकोट येथील हवाई दलाच्या तळावर हल्ला केला होता. या हल्ल्यात हवाई दल आणि एनएसजीच्या ७ जवानांसह आठ जण ठार झाले होते. एनआयएनुसार, दोन दिवसांच्या चकमकीनंतर नसीर हुसैन, हाफिझ अबू बकर, उमर फारूक आणि अब्दुल कयुम हे चार दहशतवादी ठार झाले होते. ते पाकिस्तानमधील अनुक्रमे वेहारी (पंजाब), गुजरानवाला (पंजाब), संघहार (सिंध) आणि सुक्कुर (सिंध) जिल्ह्याचे रहिवासी होते. हल्ला करण्यापूर्वी एका दहशतवाद्याने काही मिनिटांपूर्वी केलेले संभाषण, फोन क्रमांक आणि हल्ल्यानंतर जैशशी संबंधित वेबसाइटवर रऊफचा व्हिडिओ मेसेज याचीही एनआयए चौकशी करेल. रउफने त्या मेसेजमध्ये हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मात्र, त्यानंतर हा मेसेजच काढून टाकण्यात आला होता. बामियाल येथे एका दहशतवाद्याच्या पायांचे ठसे आढळले होते. दहशतवाद्यांनी पंजाबमधील पोलिस अधीक्षक सलविंदर सिंग यांची कार पळवून नेली होती. त्या कारमध्ये आढळलेल्या डीएनएचे नमुनेही एनआयए पडताळून पाहील.
पाकिस्तानमधील संयुक्त तपास पथकानेही भारतात येऊन पठाणकोट हल्ल्याचा सविस्तर तपास केला होता.
आंतरराष्ट्रीय दबाव आणण्यासाठी होणार मदत
या नव्या आरोपपत्रामुळे अझहर आणि त्याच्या संघटनेला संयुक्त राष्ट्रांच्या दहशतवादविरोधी कायद्यानुसार आंतरराष्ट्रीय दहशतवादी गट घोषित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायावर दबाव आणण्यासाठी भारताला मदत होईल. भारताचा याआधीचा प्रयत्न चीनने व्हेटो वापरल्यामुळे अयशस्वी ठरला होता.
बातम्या आणखी आहेत...