आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Allow Us To Make Mistakes, Allow Us To Learn” Kejriwal Said We In Learnig Process

केजरीवालांच्या हिटलिस्टवर सोनियांसह मोदीही; गडकरींनी पाठवली नोटीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी तयार केलेल्या 'बेइमान नेत्यांच्या यादी'त आता काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे देखील नाव समाविष्ट करण्यात आले आहे. आज (शनिवार) झालेल्या पत्रकार परिषदते पक्षाचे प्रवक्ते योगेंद्र यादव यांनी सोनियांच्या नावाचा समावेश घराणेशीसाठी आणि मोदींचे नाव द्वेषाचे वातावरण पसरवण्यासाठी या यादीत घेण्यात आले असल्याचे सांगितले आहे.
आपच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीने खळबळ उडवून दिली होती. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ‘हे बेइमान नेते आहेत..’ म्हणत एक यादी वाचली. यात मोदी वगळता राहुल गांधींपासून शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, नितीन गडकरी अशा नेत्यांचा समावेश होता.
अशा 161 नेत्यांविरुद्ध देशभर तगडे उमेदवार देण्याची घोषणा या वेळी करण्यात आली. दरम्यान, केजरीवालांनी माफी मागितली नाही तर खटला दाखल करण्याचा इशारा गडकरी यांनी दिला आहे.
गडकरींनी पाठवली नोटीस
राजकारणात ह्यात घालवलेल्या 161 नेत्यांना अरविंद केजरीवाल यांनी बेइमान म्हटल्याने ते वादाच्या भोव-यात अडकताना दिसत आहेत. शनिवारी भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी अ‍ॅड. बालेंदू शेखर यांच्यामार्फत केजरीवाल यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली आहे. तर, दुसरीकडे केंद्रींय मंत्री कपिल सिब्बल यांनी केजरीवालांच्या आरोपात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

दोन दिवसांत त्यांनी आरोप सिद्ध करावे अन्यथा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा असे आव्हान सिब्बल यांनी केजरीवालांना दिले आहे. माझ्यावरील आरोप सिद्ध झाले तर मी राजकारणातून सन्यास घेईल, असेही सिब्बल म्हणाले आहेत.

पुढील स्लाइडमध्ये, केजरीवालांनी 'रॉयटरटला दिलेली खळबळजनक मुलाखत