आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Allowances Were Getting The Hair Cutting, Boot Polish

केशकर्तनासहित बूटपॉलिश, कुटुंब नियोजनास बाबूंना मिळत होते भत्ते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना अनेक अजब भत्ते वर्षानुवर्षे दिले जात आहेत. यातील काही भत्त्यांची माहिती घेतल्यास मोठी रंजक बाब समोर येते. या भत्त्यांमध्ये केस कापण्यासाठी प्रति महिना ५ रुपये, तर सायकलच्या वापरासाठी ९० रुपये भत्त्याचा समावेश आहे. एवढेच नव्हे, तर छोट्या कुटुंबाला प्रोत्साहन देण्यासाठी कुटुंब नियोजन भत्ताही मिळतो आहे. सद्य:स्थितीत ४७ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि ५२ लाख निवृत्तिवेतनधारकांना १५ श्रेणींमध्ये विविध १९६ भत्ते दिले जात आहेत.
सातव्या वेतन आयोगाने ५२ भत्ते पूर्णपणे बंद करण्याची शिफारस केली आहे. दुसरीकडे ३६ भत्त्यांचे सध्याचे स्वरूप संपुष्टात आणत त्यांना अन्य भत्त्यांत समायोजित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विविध प्रकारच्या भत्त्यांची माहिती खुद्द कर्मचाऱ्यांनाही नाही. त्यांनी या भत्त्यांचा कधी लाभही घेतला नाही. या मुद्द्यावर दैनिक भास्करने वेतन आयोगाचे प्रमुख न्या. ए. के. माथूर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, केस कापणे, सायकलचा वापर करणे किंवा कुटुंब नियोजनासाठीचे भत्ते सध्याच्या सामाजिक स्थितीत कोणीही न्यायसंगत ठरवू शकत नाही. आम्ही बूटपॉलिश आणि कपडे धुण्यासाठीचा भत्ता समाप्त करून ते एकत्रित लिव्हिंग अलाऊन्समध्ये जोडण्यात आले. भत्ते जास्त तर्कसंगत आणि कालानुरूप बनवणे हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सर्वाधिक ५१ पद्धतीचे भत्ते जोखमीशी संबंधित श्रेणीतील कामात दिले जातात. १५ प्रकारचे योग्यता भत्ते आणि जास्त व अतिरिक्त ड्यूटीसाठी १४ प्रकारच्या भत्त्यांची व्यवस्था आहे. याशिवाय १३ प्रकारचे प्रवास भत्ते मिळतात. विविध कर्मचारी वर्गांसाठी ९ प्रकारचे गणवेश भत्ते मिळतात. न्या. माथूर म्हणाले, खोलवर विचार केल्यास अनेक भत्ते याआधीच संपुष्टात यायला हवे होते. आम्ही सरकारला योग्य वेळी अहवाल दिला आहे. आता निर्णय सरकारला घ्यावयाचा आहे.
वेतन-भत्त्यांतील वाढीमुळे एक लाख कोटींचा भार वाढेल
केंद्रीय कर्मचाऱ्यांना वेतन-भत्त्यांत वाढ करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये १६ टक्के वाढ वेतनात आणि ६३ टक्के भत्त्यांत होईल. निवृत्तिवेतन २४ टक्क्यांपर्यंत वाढू शकेल. या शिफारशी जशाच्या तशा लागू केल्यास तिजोरीवर १.०२ लाख कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडेल.
निम्मेअधिक भत्ते गरजेचे
- तज्ञांनुसार, १०८ भत्त्यांत निम्म्याहून अधिक वेतनाचाच भाग. ते आवश्यकही आहेत. उदा. वाहतूक, एचआरए आदी.
- विशेष कामासंदर्भात होणारे खर्च उदा. टीए-डीए, दैनंदिन खर्च यासारखे भत्ते आवश्यक.
-मात्र काही ठरावीक जबाबदारीसाठी दिला जाणारा उदा. चौकशी भत्ता बंद करणे योग्य आहे.
अशा अजब बाबींसाठीही मिळत होते भरमसाट भत्ते
हेअर कटिंग - ५ रुपये प्रति महिना हेअर कटिंग भत्ता सीआयएसएफच्या जवानांना दिला जात होता.
शिफारस- एकत्रित वैयक्तिक खर्चात तो जोडला.
कुटुंब नियोजन - यात वेगवेगळ्या कर्मचारी वर्गासाठी २१० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत भत्ते दिले जातात.
शिफारस- तर्कसंगत नाही, त्यामुळे तो समाप्त करावा.
सोप टॉयलेट - आसाम रायफल्सच्या ग्रुप बी आणि सीच्या कर्मचाऱ्यांना दर महिन्यास ९० रुपये मिळतात.
शिफारस- समाप्त करून एकत्रित वैयक्तिक खर्चाच्या भत्त्यात समाविष्ट.
झोपडी: महामारी पसरल्यानंतर रेल्वे कर्मचाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात झोपडी करण्यासाठी दर महिन्यास १०० रु. दिले जातात.
शिफारस: कालबाह्य आहे, समाप्त करावा.
कोर्ट भत्ता: एनआरआयच्या विधी अधिकाऱ्यांना दिला जातो. १५०० रु. आणि २००० रु. दर महिन्यास देय आहे.
शिफारस- समाप्त करावा.
चष्मा- सुरक्षा दलात दृष्टिदोष असलेल्यांना १३० व २५० रु. भत्ता दिला जातो.
शिफारस- वैयक्तिक खर्च भत्त्यात.
तपास- कंपनी व्यवहार, घोटाळ्यांचा तपास यात प्रभावी व्यक्ती याव्यात यासाठी २००० रु.
शिफारस- समाप्त करावा.
अंत्यसंस्कार- शांतता क्षेत्रात मृत्यू-लष्करी कर्मचाऱ्यांना ६००० रु. भत्ता दिला जातो.
शिफारस- समाप्त करावा
पीएचडी आणि पीजीसाठीही भत्त्यांची तरतूद
नागरी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी मिळणारे भत्ते कायम ठेवण्याबरोबर त्याची आणखी चांगली आखणी करण्याची शिफारस करत वेतन आयोगाने म्हटले की, तीन वर्षांच्या पदवी-पदविकेसाठी १० हजार रु. आणि पीएचडीवर ३० हजार रु. दिले जावे. पीजी डिप्लोमावर २० तसेच २५ हजार रु. देण्याची शिफारस केली आहे. मात्र, संपूर्ण करिअरमध्ये केवळ दोन वेळेस हा भत्ता मिळावा.