आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेएनयूप्रकरणी काेर्टात दिलेला अहवाल बेकायदा, अभाविपचे अलोक सिंह यांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात नऊ फेब्रुवारी राेजी परवानगी न घेता काही लाेकांनी एक कार्यक्रम घेऊन त्यात देशविराेधी घाेषणा देण्यात अाल्या. याप्रकरणी उच्च न्यायालयने अहवाल मागवला हाेता. मात्र अधिकार नसताना दिल्ली सरकारने या घटनेबाबत बेकायदा अहवाल तयार करून ताे जाहीर केला, असा अाराेप जेएनयू विद्यापीठातील अभाविपचे अध्यक्ष अलाेक सिंह यांनी साेमवारी केला.

जेएनयू प्रकरणाबाबत अभाविपने कुलगुरूंकडे तक्रार दिली अाहे. देशविराेधी घाेषणाबाबत देशभरातील सर्व नागरिकांनी विराेधच करायला हवा, परंतु घटनात्मक अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या नावाखाली लाेकांमध्ये संभ्रम निर्माण करून वैचारिक गाेंधळ तयार करण्याचे काम काही संस्था, संघटना करत अाहेत. राहुल गांधी, सीताराम येचुरी यांनी जेएनयू प्रकरणाचे राजकारण केले आहे. जेएनयूत ६०० प्राध्यापक असून त्यापैकी २०० प्राध्यापक डाव्या विचारसरणीचे असल्याने त्यांनीही या अांदाेलनाला पाठिंबा दिला ही खेदाची बाब अाहे. देशभरातील काेणत्याही विद्यापीठात भारतविराेधी अांदाेलने झाल्यास त्याला अभाविपचा विराेध राहील, असे सिंह म्हणाले.
महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांत जेएनयू अांदाेलनाचा निषेध व्यक्त करण्यासाठी अांदाेलने केली जाणार असल्याचा इशारा अभाविप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रा. डाॅ. प्रशांत साठे व प्रदेशमंत्री राम सातपुते यांनी दिला.
बातम्या आणखी आहेत...