आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Although We Are Componanat Party But We Are With People, The Shiv Sena Party Chief Uddhav Thackeray's Comments

घटक पक्ष असलाे तरी अाम्ही जनतेसाेबतच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अाम्ही केंद्रात एनडीएचे घटक पक्ष असलाे तरी सरकारचा प्रत्येक निर्णय मान्य करूच, असे नाही. अाम्ही प्रत्येक वेळी जनतेच्या साेबत असताे, असे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. नाेटाबंदी निर्णयावर बाेलताना त्यांनी माेदींच्या ५० दिवसांची अाठवण करून दिली. ३० दिवस झाले, आणखी २० दिवस थांबा, अच्छे दिन येणार अाहेत, अशी उपराेधिक टीकाही त्यांनी केली.

राज्यसभेतील शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी उद्धव ठाकरे पत्रकारांशी बाेलत हाेते. ते म्हणाले, भारतात ६५ टक्के लोक शेती करतात. यातील बहुतांश शेतकरी रोखीचा व्यवहार करतात. सहकारी बँकांमध्ये त्यांची खाती आहेत. शेतीचे उत्पन्न आयकरमुक्त आहे याची कल्पना असतानाही नोटाबंदीच्या निर्णयानंतर सहकारी बँकांच्या व्यवहारांवर सरकार व रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले आहेत. ते कशासाठी? शेतकऱ्यांवर आयकर लावण्याचा सरकारचा इरादा दिसताे.

नोटाबंदीचा निर्णय योग्य की अयोग्य, याबाबत शिवसेनेचे नेमके मत काय? असे विचारता ठाकरे म्हणाले, मी अथवा आमच्यापैकी कोणी अर्थतज्ज्ञ नाही. माजी पंतप्रधान व आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहनसिंग, नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन व देशातल्या अनेक मान्यवर अर्थतज्ज्ञांनी नोटाबंदीच्या निर्णयाच्या विरोधात जाहीरपणे प्रतिकूल मत व्यक्त केले आहे. या क्षेत्रातील त्यांची योग्यता पाहता एक तर सरकारने त्यांचे मत गांभीर्याने घेतले पाहिजे अथवा बदलत्या अर्थकारणात त्यांना काही कळत नाही, असे जाहीर करावे.

रांगेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबीयांना मदत द्या
रांगेत उभे राहून ज्यांचा मृत्यू अाेढवला त्यांच्या कुटंुबीयांना प्रत्येकी दाेन लाख रुपये देण्याची घाेषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी केली. केंद्र सरकारने अाणि महाराष्ट्रासह प्रत्येक राज्याने अशी मदत जाहीर करावी. सरकारला अपेक्षित असलेला काळा पैसा आणि बनावट नोटा कुठे गेल्या, या प्रश्नावर ठाकरे म्हणाले, केंद्र सरकारला या साऱ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीच लागणार आहेत.

अडवाणींचे मत गांभीर्याने घेण्याची गरज
लालकृष्ण अडवाणी सर्वात अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे मत सरकारने गांभीर्याने घेतले पाहिजे. त्यांनी लाेकसभा चालत नसल्याबद्दल जाे ठपका ठेवला त्यावर सरकारने गांभीर्याने विचार करणे गरजेचे अाहे, अशी टिप्पणीही ठाकरे यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...