आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल स्वरूपात विविध कथांचा मनमुराद आस्वाद; मोबाइल-टॅब्लेटवर वाचा अमर चित्रकथा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नेटसॅव्हींसाठी खुशखबर आहे. अकबर, चाणक्य, जवाहरलाल नेहरू आणि जेआरडी टाटा यांच्यासारख्या अनेक प्रेरणादायी व्यक्तिरेखांच्या कथा आता कॉमिक्सच्या स्वरूपात मोबाइलवर डाऊनलोड करून कधीही, कोठेही वाचता येणार आहेत.

अमर चित्रकथांचे एसीके कॉमिक्स या अ‍ॅपचे लाँचिंग करण्यात आले. या कथा विंडोज- 8, आयओएस आणि अँड्राइड या संगणक प्रणालींवर एका अ‍ॅपच्या मदतीने अँड्राइडवर उपलब्ध होतील. अ‍ॅप-9 डिजिटल स्टुडिओ यांच्यामार्फत हा अ‍ॅप विकसित करण्यात आला आहे. अमर चित्रकथा प्रकार हा भारतीयांचा सर्वात आवडता विषय आहे. कॉमिक पुस्तकांची मालिका भारतीयांप्रमाणेच एनआरआयमध्येदेखील तेवढीच लोकप्रिय आहे, असे अमर चित्रकथाचे सीओओ मानस मोहन यांनी म्हटले आहे. अमर चित्रकथांचे डिजिटलायझेशन म्हणजे पिढ्यान्पिढ्यापासून चालत आलेला वारसा नेटसॅव्ही असलेल्या नवीन पिढीपर्यंत पोहोचणार आहे. या माध्यमातून लाखो वाचकांपर्यंत पोहोचण्याची संधीदेखील मिळाली आहे. कंपनीचे गेल्या काही वर्षांतील उत्पन्न 30-40 टक्क्यांनी वाढले आहे; परंतु कंपनीने नेमकी किती कमाई केली आहे याचा तपशील मात्र मोहन यांनी स्पष्ट केला नाही.
1,00, 000
लाख डाऊनलोडचे आमचे पहिल्या दीड महिन्यातील लक्ष्य.

5,00,000
एवढ्या अमर चित्रकथाच्या मुद्रित प्रतींचा मासिक खप.

10 कॉमिक्स मोफत
चाणक्य, सम्राट अशोक, अकबर, जवाहरलाल नेहरू, बाबासाहेब आंबेडकर, बिरबल, जेआरडी टाटा, सुब्बलक्ष्मी, गणेश आणि ध्यानचंद यासारखी व्यक्तिचित्रे या अ‍ॅपद्वारे मोफत मिळणार आहेत.

सारखेच दर
आयओएस आणि अँड्रॉइड या दोन्हींवर अ‍ॅपद्वारे मिळणारे कॉमिक्स समान किमतीमध्ये उपलब्ध होणार आहेत. म्हणूनच 99 टक्के समान दर असलेले कॉमिक्स युजरला सहजपणे डाऊनलोड करता येणार आहेत.

आकर्षक डिजिटल स्वरूप
कॉमिक्सचे हे डिजिटल स्वरूप युजरला अतिशय अनुकूल आहे. त्यामुळे वाचकांना या अ‍ॅपवर वाचनाचा चांगल्या प्रकारे अनुभव घेता येणार आहे, असा दावा करण्यात आला आहे.