आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या वर्षी असे सुरेख दिसत आहेत अमरनाथ बाबा, Photos मध्ये पाहा \'प्रथम पूजा\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बर्फानी बाबाची पहिली पूजा केली. - Divya Marathi
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी बर्फानी बाबाची पहिली पूजा केली.
जम्मू/नवी दिल्ली - दक्षिण काश्मीर भागात शनिवारी पवित्र अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. या वर्षी अमरनाथ गुहेमध्ये बर्फानी बाबाचे हिमलिंग सुरेख आकारात दिसत आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह आणि जम्मूचे राज्यपाल एन.एन व्होरा यांनी कडक सुरक्षा व्यवस्थेमध्ये हिमालय स्थित अमरनाथ गुहेमध्ये पहिल्या पूजेच्या वेळी पवित्र हिमलिंगाचे दर्शन घेतले. अमरनाथ यात्रा एकूण 48 दिवस चालेल.

अशाप्रकारे आहे सुरक्षा व्यवस्था...
- राज्यपाल आणि गृहमंत्री यांच्या व्यतिरिक्त अनेक भक्तांची पहिली तुकडी बर्फानी बाबाच्या दर्शनासाठी पोहोचली.
- राजनाथ सिंह शुक्रवारीच काश्मीरला पोहोचले होते आणि नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या चौकशी निमित्त त्यांनी एक उच्च स्तरीय मिटिंग घेतली.
- या दरम्यान अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेची माहितीसुद्धा घेतली.
- या मिटिंगमध्ये अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेविषयी विस्तारपूर्वक चर्चा झाली.
- अमरनाथ यात्रेमधील भक्ताच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफ, बीएसएफ आणि सैन्य दलाचे विशेष पथक सज्ज आहेत.

प्रत्येक टप्प्यावर फोर्स
- अमरनाथ यात्रेच्या मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर सुरक्षा यंत्रणा तैनात आहे.
- दहशतवादी संघटनेचा धोका लक्षात घेऊन अमरनाथ गुहेची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, अमरनाथ गुहेतील आणि इतर काही निवडक फोटो...
बातम्या आणखी आहेत...