आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

J&K मध्‍ये हिंसाचार: हिजबुल कमांडर वानीच्या मृत्यूमुळे धक्का : शरीफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद/ लाहोर - हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानीच्या मृत्यूनंतर पाकिस्तानने पुन्हा खोडसाळपणा केला आहे. वानीच्या मृत्यूमुळे आपल्याला धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केली आहे. शरीफ यांनी वानीला ठार मारल्याच्या घटनेचे ‘एक्स्ट्रा ज्युडिशयल किलिंग’ असे वर्णन केले आहे. त्याचबरोबर काश्मीर खोऱ्यात वानीच्या मृत्यूच्या विरोधात निदर्शने करत असलेल्या नागरिकांवर झालेली कारवाई ‘बेकायदा’ असल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. पाकिस्तान हा मुद्दा मानवाधिकाराशी जोडून तो आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्याच्या प्रयत्नात आहे.
पाकिस्तानने सोमवारी भारतीय उच्चायुक्तांना पाचारण करून वानी आणि इतर नागरिकांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त केली. या घटनेत मानवाधिकारांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करा, असे पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी भारतीय उच्चायुक्तांना सांगितले.
दरम्यान, पाकिस्तानच्या टीकेला कडक प्रत्युत्तर देताना केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू म्हणाले की, पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये, त्याऐवजी त्या देशाने पाकव्याप्त काश्मीरमधील मानवाधिकार उल्लंघनाची चिंता करावी. दुसरीकडे, भारतातील फुटीरवादी कारवायांना हवा देण्यासाठी जमात-उद-दावा आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटना एकत्र आल्या आहेत. पाक अधिकृत काश्मीरमधील मुझफ्फराबादमध्य बुरहान वानीला श्रद्धांजली वाहण्यासाठी हिजबुलचा म्होरक्या सय्यद सलाउद्दीन आणि मुंबईतील दहशतवादी हल्ल्यांचा मास्टरमाइंड हाफीज सईद एका मंचावर आले होते.
तिसऱ्या दिवशीही हिंसाचार, बळींची संख्या ३०
श्रीनगर- काश्मीर खोऱ्यात तिसऱ्या दिवशीही हिंसाचार सुरूच होता. मृतांची संख्या ३० वर पोहोचली असून ३०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. जमावाने पुलवामा येथे हवाई दलाच्या विमानतळावर हल्ला करून आग लावण्याचा प्रयत्न केला. अनेक ठिकाणी पोलिस चौक्यांवर दगडफेकही झाली. संचारबंदी जारी असल्याने जनजीवन विस्कळीत झाले. दुकाने, खासगी कार्यालये बंद होते.
तीन दिवसांनंतर अमरनाथ यात्रा सुरू
जम्मू - तीन दिवसांपासून बंद असलेली अमरनाथ यात्रा सोमवारपासून पुन्हा सुरू झाली. दुपारनंतर जम्मू येथून भाविकांच्या ४० बसचा ताफा कडक सुरक्षा व्यवस्थेत रवाना झाला. दर्शन करून २०० बसमधून परतलेल्या भाविकांना घरी परत पाठवण्यासाठीही विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, काश्मीर खोऱ्यात पाचव्या दिवशीही हिंसाचार...
बातम्या आणखी आहेत...