आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाजपेयींनी सांगितले तर भारतरत्न परत करेन; अमर्त्य सेन यांचे भाजपला प्रत्युत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशाचे माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी सांगितल्यानंतरच 'भारतरत्न' परत करणार असल्याचे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी स्पष्ट केले आहे. अमर्त्य सेन यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडी (रालोआ) सरकारच्या कार्यकाळात 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. परंतु सेन यांच्या एका विधानामुळे नव्या वादाला खतपाणी मिळाले आहे. सेन यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदींना पंतप्रधान होण्याला कडवा विरोध दर्शवला होता. देशाचा राज्यकारभार पाहाण्यासाठी मोदी योग्य उमेदवार नसल्याचे सेन म्हणाले होते.
सेन यांच्या वक्तव्यामुळे नाराज झालेले भाजपचे खासदार चंदन मित्रा यांनी तिव्र नाराजी व्यक्त केली होती. भाजपच्या नेत्याला नाकारणार्‍या अमर्त्य सेन यांच्याकडून भारतरत्न पुरस्कार परत घेतला पाहिजे, असे मि‍त्रा यांनी म्हटले होते. त्यावर सेन त्यांनी तत्काळ प्रत्युत्तर दिले.

पुढील स्लाईडवर वाचा, 'नरेंद्र मोदींबाबत अमर्त्य सेन म्हणाले होते तरी काय?'