आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशाचे नेतृत्व करण्‍यास राहुल सक्षम, मोदी प्रभावहीन; नोबेलविजेते अमर्त्य सेन यांचे मत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे देशाच्या पंतप्रधानपदासाठी योग्य असल्याचे मत नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनी मत व्यक्त केले आहे. ते एका खासगी वृत्तवाहिनीशी बोलत होते. यापूर्वी सेन यांनी देशाच्या पंतप्रधानपदासाठी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी योग्य नसल्याचे परखड मत व्यक्त करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.

राहुल गांधी यांचे व्यक्तीमत्व मला आवडते. राहूल यांचा लोकशाही विचारांवर विश्वास आहे. एक भारतीय नागरिक म्हणून मला त्यांच्यावर गर्व आहे. राहूल यांनी माझ्या महाविद्यालयातून शिक्षण घेतले आहे. देशाचे नेतृत्व करण्यासाठी ते सक्षम असल्याचेही सेन यांनी सांगितले.
भाजपचे नेते नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील परखड वक्तव्यामुळे निर्माण झालेला वाद आता चांगलाच चिघळताना दिसत आहे. मोदी समर्थकांनी अमर्त्य सेन यांच्यात जोरदार शाब्दिक हल्ला केला आहे.
अमर्त्य सेन अमेरिकेत राहतात. ते भारतात मतदार करतात काय? असा सवाल करत त्यांच्याकडून 'भारतरत्न' परत घेतला पाहिजे, अशी मागणी भाजपचे खासदार चंदन मित्रा यांनी केली होती. परंतु, मित्रा यांचे हे वैयक्तिक मत असल्याचे सांगून भाजपने कानावर हात ठेवले आहे.

'ज्येष्‍ठ नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी सांगितले, तरच आपण भारतरत्न परत करू', असे सेन यांनी मित्रा यांच्या मागणीला प्रत्युत्तर दिले होते.

पुढील स्लाईडवर वाचा, 'नरेंद्र मोदींबाबत अमर्त्य सेन म्हणाले होते तरी काय?'