नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी आता 67 वर्षांचे झाले आहेत. यानिमित्त divyamarathi.com आपल्याला आणीबाणीच्या काळातील मोदींविषयी आपल्याला माहिती देणार आहे. 42 वर्षांपुर्वी जेव्हा देशात आणीबाणी लागली होती तेव्हा मोदी 25 वर्षांचे होते. त्याकाळी त्यांनी एका पंजाबी व्यक्तीचा पेहराव केला होता. याच वेशात त्यांनी अनेक दिवस काढले.
या काळात मोदींनी सूचना पाठविण्याचा काढला होता नवा पर्याय
- गुजरातमध्ये आणीबाणी विरोधात मोदी सक्रीय होते. ते गुजरात लोकसंघर्ष समितीत होते.
- संघटना सांभाळण्याची त्यांची हातोडी पाहून त्यांना समितीचे महासचिव पद देण्यात आले. त्यांच्यावर राज्यातील आंदोलनकर्त्यांना एकत्रित करण्याची जबाबदारी होती. हे खूपच कठीण काम होते पण मोदींनी ते करुन दाखवले.
कशी होती त्या काळातील परिस्थिती
- इंदिरा गांधी यांच्याविरोधात 12 जून 1975 रोजी कोर्टाचा निर्णय आला होता. त्याच दिवशी गुजरातमध्ये सत्तारुढ काँग्रेस पराभूत झाली होती. गुजरातमध्ये इंदिरा गांधींनी गुजरातची सून सांगत मते मागितली होती. पण गुजरातच्या जनतेने त्यांना नाकारले होते.
- त्यानंतर आणीबाणी लागू करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्यात आली.
- आरएसएसवर बंदी घालण्यात आल्यानंतर केशवराव देशमुख यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आणीबाणीविरोधात नरेंद्र मोदींनी रणशिंग फुंकले.
पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो आणि माहिती