अहमदाबाद (गुजरात) - गुजरातमध्ये इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत अभ्यासाला असलेले 'राष्ट्रीय महापुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर' हे पुस्तक गुजरात सरकारने अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय घेतला. या पुस्तकात हिंदू धर्माच्या विरोधात आक्षेपार्ह मजकूर असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
गुजरात राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने बाबासाहेबांच्या 125 व्या जयंतीनिमित्त या पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले होते. त्यावर राज्यस्तरावर स्पर्धाही घेतली जाणार होती. पण, याच विभागाने हे पुस्तक मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
पुढील स्लाइड्वर वाचा, नेमके काय आक्षेपार्ह आहे पुस्तकामध्ये...