आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • America Banned Chikalthana And Waluj Industrial Medicine

चिकलठाणा, वाळूजला निर्मित औषधी वोक्हार्टकडून "रिकॉल'; अमेरिकेत सुरू होती विक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - औरंगाबादच्या चिकलठाणा वाळूज प्रकल्पात निर्मित निवडक १३ औषधे वोक्हार्टने अमेरिकी बाजारपेठांतून रिकॉल केली आहेत. अमेरिका अन्न औषधी प्रशासनाने (यूएसएफडीए) दोन्ही प्रकल्पांवर आयातीसंबंधी अलर्ट जारी केलेला आहे. वोक्हार्टने त्यापूर्वी तयार झालेली निवडक औषधे अमेरिकेच्या बाजारातून मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसे वोक्हार्टने मुंबई शेअर बाजाराला कळवले आहे.

यूएसएफडीएचाअहवाल :
यूएसएफडीएच्यामते, वोक्हार्टच्या वाळूज, चिकलठाणा प्रकल्पात औषधी निर्मितीत दर्जा राखला जात नसल्याबद्दल काही निरीक्षणे नोंदवली होती. त्यामुळे अलर्ट जारी केला होता.
शेअरची पडझड
मुंबई शेअर बाजारात वोक्हार्टच्या शेअरची ६.५२% घसरण झाली.
मागील बंद - १३३०.०५
सध्याचा बंद - १२४३.५५

मेटोप्रोलॉल एक्स आर बीपी नियंत्रणासाठी वापरले जाते.
वाळूज प्रकल्पात द्रवरूप घन स्वरूपातील इंजेक्शन्स होतात. यावर इम्पोर्ट अलर्ट जारी होता.

ही औषधे रिकॉल
वोक्हार्टच्याएल-१ चिकलठाणा येथील प्रकल्पात तयार करण्यात आलेले मेटोप्रोलॉल एक्स आर हे औषध रिकॉल.

प्रतिबंधात्मक पाऊल
यूएसएफडीएनेचिकलठाणा एल-१ वाळूज प्रकल्पावर २०१३ मध्ये आयातीसंबंधी अलर्ट जारी केला होता. मात्र, प्रतिबंधक उपाय म्हणून त्यापूर्वीची काही औषधे अमेरिकी बाजारातून परत घेत आहोत. रुग्णांसाठी ती पूर्ण सुरक्षित आहेत, असे कंपनीचे म्हणणे आहे.