आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोल्ट्री आयातप्रकरणी डब्ल्यूटीओत भारत अमेरिकेकडून पराभूत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पोल्ट्री आयात प्रकरणात भारताला अमेरिकेकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या अपील प्राधिकरणाचा निर्णय भारताच्या विरोधात गेला आहे. अपीलीय प्राधिकरणाने भारताने अमेरिकेतून आयात केल्या जाणा-या पोल्ट्री उत्पादनांवर म्हणजे मटन, अंडी व डुकराच्या आयातीवर बंदी घातली होती. परंतु ही बंदी आंतरराष्ट्रीय नियमांच्या परस्परविरोधी असल्याचे अपीलीय प्राधिकरणाने म्हटले आहे. डब्ल्यूटीओचा निर्णय लागू करण्यास भारताला पुढचे एक ते दीड वर्षे लागणार आहे.

भारताने ऐव्हीयन इन्फ्लूएंझाचे संक्रमण रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून २००७ मध्ये अमेरिकेतील विविध कृषी उत्पादनांच्या आयातीवर बंदी घतली होती. त्याविरोधात अमेरिकेने मार्च २०१२ मध्ये डब्ल्यूटीओचा दरवाजा ठोठावला होता.