आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावास व न्यूयॉर्कमधील भारतीय राष्ट्रसंघ कार्यालयांमध्ये काम करणा-या भारतीय राजनैतिक अधिका-यांवर अमेरिकेने अतिप्रगत इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या साहाय्याने पाळत ठेवल्याचे उघडकीस आले आहे. अमेरिकेच्या या हेरगिरी कार्यक्रमांतर्गत या कार्यालयामधील संपूर्ण माहिती साठवणारी ‘हार्ड डिस्क’च अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेने (एनएसए) हस्तगत केली.
हेरगिरीसाठी निवडलेल्या देशांच्या यादीत भारताचाही समावेश असून ही भारतीय कार्यालये अमेरिकेच्या हेरगिरी कार्यक्रमात ‘हिट लिस्ट’वर असल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतीय दूतावासामधील राजनैतिक अधिका-यांचे संगणक, त्यांची दूरध्वनीवरील संभाषणे या सर्वांची माहिती एनएसएने गुप्तरीत्या मिळवली. भारतीय कार्यालयांमधील अत्यंत गोपनीय समजली जाणारी उच्च राजनैतिक वर्तुळामधील माहिती अमेरिकेने वेगवेगळ्या साधनांचा वापर करून मिळवल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.