आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • US President Barack Obama India Visit America Will Spend One Thousand Crore

ओबामांच्या भारतातील सुरक्षेवर कोट्यवधी खर्च करतोय अमेरिका, वाचा REPORT

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनानिमित्त अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारत भेटीवर येत आहेत. रविवारी (25 जानेवारी) पहाटे चार वाजता दिल्लीत आगमन होईल. ओबामा दुसर्‍यांदा भारत भेटीवर येत आहे. यापूर्वी 2010 मध्ये ओबामा पहिल्यांदा भारत भेटीला आले होते. तेव्हा अमेरिकेने सुमारे एक हजार कोटी रुपये (200 मिलियन डॉलर्स) खर्च केले होते. यावेळी मात्र, अमेरिका कोट्यवधी रुपये खर्च करत असल्याची माहिती मिळाली आहे.

बराक ओबामांच्या सुरक्षिततेवर सर्वाधिक खर्च केला जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ओबामांच्या सुरक्षेत तैनात करण्यात आलेले अमेरिकन ‘डॉग ऑफिसर्स’ स्क्वॉड भारतात पोहोचला आहे. याला 'इलीट k-9' असे म्हटले जाते.

ओबामांच्या सुरक्षेसाठी पहिल्यांदा 'अवॉक्स'चा प्रयोग
26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून बराक ओबामा भारत भेटीला येत आहेत. या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागाने देशाच्या अनेक भागात दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली आहे. ओबामांच्या सुरक्षेसाठी 'एअरबॉर्न वॉर्निंग अॅण्ड कंट्रोल सिस्टम'चा (अवॉक्स) पहिल्यांदा प्रयोग करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान, मागिल काही दिवसांपूर्वी जम्मूमधील कठुआ भागात सात दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. पाकिस्तानातून आलेल्या दहशतवाद्यांविषयी अद्याप ठोस माहिती गुप्तचर विभागाला मिळू शकली नाही.

राजपथवर होणार्‍या परेड दरम्यान 'अवॉक्स' जमिनीपासून आकाशापर्यत टेहाळणी केली जाणार आहे. इस्राइल तंत्रज्ञानाने अद्ययायत असलेले 'अवॉक्स' विमान 'आयएल-76'वर बसवले जाणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम सुरु झाल्यापासून संपेपर्यंत हे विमान दिल्लीसह परिसरात घिरट्या मारत राहील.
कोणत्याही हवामानात धोकादायक सुमारे 400 किलोमीटर अंतरावर असलेल्या क्रूज मिसाइल आणि विमानाविषयी माहिती देण्याची क्षमता 'अवॉक्स'मध्ये आहे. तसेच जमिनीवरही अवॉक्सने लक्ष ठेवता येते.

विदेशी एजेंटच्या अल्‍टीमेटमनंतर नेपाळ सीमेवर अलर्ट...
बराक ओबामांच्या भारती दौर्‍याच्या पार्श्वभूमीवर नेपाळ सीमेवर अलर्ट घोषित करण्यात आले आहे. विदेशी एजन्सीद्वारा भारतीय गृहमंत्रालयाला सूचना मिळाल्यानंतर हा अलर्ट घोषित करण्‍यात आला आहे. नेपाळ सीमा ही आग्र्यापासून जवळपास सहाशे किलोमीटर अंतरावर आहे.
नेपाळमार्गे दहशतवादी भारतात घुसखोरी करू शकतात, अशी शक्यता विदेशी गुप्तचर एजन्सीने वर्तवली आहे. देशाला खेटून असलेल्या नेपाळची सीमा जवळपास 1750 किलोमीटर अंतरापर्यंत खुली आहे. त्यामुळे दहशतवादी नेपाळमार्गे भारतात घुसखोरी करू शकतात. सोनोलीजवळ सात संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून वाचा, अशी असेल बराक ओबामाची सुरक्षा व्यवस्था...