गांधीनगर, नवी दिल्ली - अमेरिकेच्या भारतातील राजदूत नॅन्सी पॉवेल यांनी गुरुवारी गांधीनगर येथे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. उभयतांमध्ये काय चर्चा झाली याचा तपशील जाहीर करण्यात आला नाही; परंतु ही भेट म्हणजे सर्व पातळीवरील भारतीय नेत्यांशी वाढत्या संपर्क व संवादाचा एक भाग असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. गेल्या 13 वर्षांत अमेरिक ी राजदूताने मोदींची भेट घेण्याची ही पहिलीच वेळ आहे. आगामी निवडणुकीत भाजप सत्तेवर येण्याची चिन्हे असल्याने उगवत्या सूर्यालाच नमस्कार केल्याचे बोलले जाते.
गांधीनगर येथे मोदींच्या निवासस्थानी पॉवेल भेटल्या. दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. मोदींनी मोठा पुष्पगुच्छ पॉवेल यांना भेट दिला. भारत-अमेरिके चे सहकार्य व संबंध महत्त्वपूर्ण असून व्यूहात्मक आहेत. त्याचप्रमाणे लोकसभा निवडणुकीनंतर सत्तेवर येणार्या सरकारसोबत काम करण्याची भूमिका आहे, असे या भेटीनंतर राजदूत कार्यालयाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे.