आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Embassy In India Not Follow Minimum Wage Law, Give Less Salary To Staff

खोब्रागडेप्रकरणी भारताने नाक दाबाताच अमेरिकेने उघडले तोंड, चुकीचा तपास सुरु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोलकरणीला कमी पगार दिला म्हणून अमेरिकेतील भारतीय मुत्सद्दी देवयानी खोब्रागडे यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगारणारी अमेरिका स्वत:च्याच किमान वेतन कायद्याचे उल्लंघन करत असून भारतातील अमेरिकी वकिलाती, वाणिज्य दूतावास आणि अमेरिकी मुत्सद्यांनी व्यक्तिश: नोकरीला ठेवलेल्या भारतीय कर्मचा-यांना ठरल्यापेक्षा कमी पगार दिला जात असल्याची धक्कादायक माहिती पुढे आल्याने अमेरिकेचा किमान वेतनाबाबतचा पवित्रा ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान...’ असाच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने स्थापन केलेल्या विशेष गटाने भारतातील अमेरिकी वकिलाती आणि वाणिज्य दूतावासातील कर्मचा-यांना देण्यात येणा-या पगाराची माहिती संकलित केली असून त्या माहितीची छाननी करण्यासाठी सोमवारी या विशेष गटाची बैठक होत आहे. अमेरिकेच्या भारतातील राजनैतिक मोहिमा आणि मुत्सद्यांच्या निवासस्थानी कार्यरत असलेल्या कर्मचा-यांना देण्यात येणारे पगार आणि अदा केला जाणारा कर याबाबतची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने मागितली. मात्र, अमेरिकी वकिलाती आणि वाणिज्य दूतावासांकडून ही माहिती देण्यास हेतुत: टाळाटाळ केली जात आहे. 23 डिसेंबरपर्यंत ही माहिती सादर करण्याची मुदत देण्यात आली होती; परंतु अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. व्हिसा गैरव्यवहार प्रकरणी अमेरिकेतील भारताच्या उपवाणिज्य महादूत देवयानी खोब्रागडे यांना न्यूयॉर्कमध्ये अटक केल्यामुळे भारताने कठोर पवित्रा घेत अमेरिकेची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली. भारतातील अमेरिकी राजदूत नॅन्सी पॉवेल आणि अन्य मुत्सद्यांच्या विशेष सुविधाही काढून घेतल्या आहेत.


नाक दाबताच तोंड उघडले... वाचा पुढे...