आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • American Foreign Minister Johan Carry Arrived In India For Three Day

अमेरिकन परराष्‍ट्रमंत्री जॉन केरी यांचे तीन दिवसासाठी भारतात आगमन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारत-अमेरिका सामरिक चर्चेत सहभागी होण्यासाठी परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांचे रविवारी येथे आगमन झाले. त्यांचा हा तीन दिवसांचा दौरा आहे. दहा कोटी डॉलर्स गुंतवणुकीची घोषणाही या दौºयात होण्याची शक्यता आहे.केरी (69) यांच्यासोबत उच्चस्तरीय शिष्टमंडळही आहे. उभय देशांच्या सामरिक चर्चेत केरी आणि परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शीद सहभागी होतील. या बैठकीत द्विपक्षीय व्यापार, संरक्षण आणि सुरक्षाविषयक सहकार्य या मुद्द्यांवर चर्चा होणे अपेक्षित आहेत.

दक्षिण आशियातील महत्त्वाचा भागीदार असे वक्तव्य केरी यांनी अमेरिका सोडताना केले होते. कतारमध्ये तालिबानने सुरू केलेल्या कार्यालयासंबंधीची माहिती भारत अमेरिकेकडून घेऊ शकतो. त्याचबरोबर एच 1 बी व्हिसाबद्दलची चिंताही केरी यांच्याकडे व्यक्त केली जाणार आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांचीही केरी भेट घेतील.