आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय पौर्णिमेला नासानेही मानले ‘गुरू’, प्रथमच जारी केला गुरुपौर्णिमेच्‍या चंद्राचा फोटो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क-  रविवारी देशभरात गुरुपौर्णिमेचा सण साजरा होत आहे. या वेळी अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था नासानेही याचे स्मरण केेले आहे. शनिवारी नासाने पहिल्यांदाच गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या टि्वटर हँडलवर चंद्राचे छायाचित्र प्रसिद्ध केले. त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशीच्या चंद्राला जगभरात आणखी कोणकोणत्या नावाने ओळखले जाते याचीही माहिती दिली. यामध्ये गुरुपौर्णिमा सर्वांत वरती आहे. या दिवशीच्या चंद्राची अन्य नावे मून, मीड मून, राइप कॉर्न मून, बक मून व थंडर मून आहेत.  
 
नासाचे हे टि्वट भारतासह जगभरातील नागरिकांना आवडत आहे. नासाने सांगितलेल्या वेगवेगळ्या नावांशिवाय त्यांच्याकडून गुरुपौर्णिमेची अन्य नावे सांगितली जात आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार, नासाने अखेर आपल्या गुरुपौर्णिमेला गुरू मानले ही देशवासीयांसाठी अभिमानास्पद बाब आहे. नासाचे टि्वट लोकांनी मोठ्या प्रमाणात रिटि्वट केल्यानंतर ते लाइकही झाले.  आषाढ महिन्यातील पौर्णिमेस गुरुपौर्णिमा म्हटले जाते. याच दिवशी महर्षी व्यासांचा जन्म झाला होता. त्यांनीच चार वेद लिहिले असे मानले जाते. त्यामुळे त्यांना वेद व्यासही संबोधले जाते. त्यांच्या नावावर गुरुपौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. याशिवाय  नासाने सांगितली पाच नावे जुलै महिन्यात  ईशान्य अमेरिका आणि इंग्लंडमधील शेतकऱ्यांमध्ये तोंडी असतात. या दिवशी ते शेतात येणाऱ्या पिकांच्या स्वागताचा उत्सव साजरा करतात.रात्रभर नाचगाणे केले जाते.

नासा, तुम्हीच अंतराळात सर्वात मोठे गुरू...अशी आल्‍या ट्विटरवर प्रतिक्रीया
- अरे देवा! आता नासाही आरएसएसला मिळाले. यावरही जातीयवादी  संस्थेचा शिक्का बसला.  - सुरेश कुचोट्ट
- खूपच संुदर छायाचित्र, त्यास कोणत्याही नावाने संबोधा. आपण त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. तुम्ही आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. - एलेन फ्राइडमॅन  
- मी ही सुंदर दृश्य पाहण्यासाठी मध्यरात्रीची वाट पाहीन. आकाशात ढग नसावेत अशी आशा करतो.  - अॅनी  
- धन्यवाद नासा, तसे अंतराळात सर्वात मोठे गुरू तुम्हीच आहात. तुमच्यापेक्षा मोठा कोणी नाही. - पिहू  
- आता तरुण, प्रौढ, लखपती, कोट्यधीश, अब्जाधीश प्रत्येक जण स्वत:ची स्वत:ला गुरू मानू लागला आहे. त्यांना खऱ्या गुरूची माहिती देण्याचे खूप मोठे काम केले आहे. धन्यवाद. - विवेक
 
पुढच्या स्लाइडमध्ये पाहा, नासाने केलेले ट्विट...
बातम्या आणखी आहेत...