आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील घातक पाणबुडीवर फडकणार तिरंगा, चीनची त्रेधातिरपिट उडवण्याची भारताची तयारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
INS कलवारी भारतीय नौदलात या महिन्यात सामील होणार आहे. (संग्रहित फोटो) - Divya Marathi
INS कलवारी भारतीय नौदलात या महिन्यात सामील होणार आहे. (संग्रहित फोटो)
नवी दिल्ली- चीन बरोबर डोकलाम भागात असणाऱ्या वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय नौदल आपली ताकद वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. INS कलवारी ही पाणबूडी लवकरच नौदलात दाखल होणार आहे. स्‍कॉर्पीन क्‍लासची ही पाणबूडी नौदलात दाखल झाल्यावर शत्रुचा समाचार घेण्याची भारताची क्षमता नक्कीच वाढणार आहे.
 
अंडरवॉटर लढाऊ दलाची क्षमता वाढणार
-  INS कलवारी भारतीय नौदलासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे अंडरवॉटर लढाईत भारताची ताकद वाढणार आहे. भारताने अशा 6 सबमरीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होते. त्यातील INS कलवारी ही पहिली पाणबूडी आहे. 
- INS कलवारी फ्रान्सची कंपनी DCNS सोबत मुंबईतील माझगांव डॉकयार्डमध्ये ही तयार करण्यात आली आहे. INS कलवारी हे नाव शार्क माशाच्या नावावरुन देण्यात आले आहे. या शार्क माशाला टायगर शार्कसुध्दा म्हटले जाते. 
- माझगांव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDSL) चे अध्यक्ष आणि एमडी कमांडर (रिटायर्ड) राकेश आनंद यांनी मागच्या महिन्यात सांगितले होती की, INS कलवारीला ऑगस्टा महिन्यात नौदलास सोपविण्यात येईल. याच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. अजून नौदलात सामील करण्याची तारीख मात्र ठरायची आहे. 
 
काय आहे विशेष?
- INS कलवारी डिझेल आणि डलेक्ट्रीक सबमरीन आहे. यात लावण्यात आलेली उपकरणे शत्रुवर हल्ला करुन त्याला उद्धवस्त करु शकतात. ही पाणबुडी पाण्यातून जमिनीवर असणाऱ्या शत्रुवरही हल्ला करु शकते. 
- या पाणबूडीला अशा पध्दतीने बनविण्यात आले आहे की, ही कोणत्याही प्रकारच्या युध्दात सहभागी होउ शकेल. यात अशी कम्युनिकेशन प्रणाली आहे की ती दुसऱ्या नौदलाच्या टास्क फोर्सशी सहज संवाद साधु शकते. 
- ही स्‍कॉर्पीन पाणबूडी सगळ्या पध्दतीच्या युध्दात  एँन्टी-सबमरीन कामासाठी आणि इंटलिजन्ससाठी वापरता येऊ शकते. यावर वेपन्स लॉन्चिंग टयूब्स बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे समुद्रात असतानाच यावर हत्यारे लोड करता येऊ शकतात. त्याचा उपयोग कोणत्याही क्षणी करता येऊ शकतात. 

पुढील स्लाईडवर पाहा आणखी फोटो
बातम्या आणखी आहेत...