आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amid Global Gloom In Markets Pm Modi To Meet India Inc Leaders Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महत्त्वाच्या उद्योगपतींना भेटले मोदी, म्हणाले- गुंतवणूक वाढवा, जोखिम स्वीकारा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक स्तरावर आर्थिक मंदीचे संकेत मिळत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील उद्योगपती, बँकर्स आणि अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक बोलावली होती. 7 आरसीआर येथे झालेल्या बैठकीत आर्थिक मंदीचा सामना कसा करायचा, त्याची तयारी काय आणि भारताची भूमिका यावर चर्चा झाली.

या बैठकीला रिलायन्स उद्योग समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, टाटा ग्रुपचे प्रमुख सायरस मिस्त्री, रिझर्व्ह बँकेचे चेअरमन रघुराम राजन, निती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया आणि अर्थमंत्री अरुण जेटली, केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, ऊर्जा मंत्री पीयूष गोयल आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान उपस्थित होते. बैठकीत पंतप्रधानांनी उद्योगपतींना गुंतवणूक वाढवण्याचा सल्ला दिला. त्यासोबतच जोखिम पत्करण्यास घाबरू नका असेही मोदी म्हणाले. उद्योगपतींनी त्यांच्याकडे व्याजदरात कपात आणि उद्योग पॉलिसी अधिक सहज करण्याची मागणी केली.

जीएसटीवर झाली चर्चा, भू-संपादनावर कोणीही बोलले नाही
सीआयआयचे अध्यक्ष सुमित मजूमदार म्हणाले, 'पंतप्रधानांनी सांगितले, उद्योगपतींनी गुंतवणूक वाढवली पाहिजे, धोका पत्करुन गुंतवणूक वाढवली पाहिजे. उद्योगांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली पाहिजे.' फिक्की अध्यक्ष ज्योत्सना सूरी म्हणाल्या, पंतप्रधान म्हणाले हा आमच्यासाठी फायदा करुन घेण्याचा आणि गुंतवणूक वाढवण्याचा काळ आहे. मला माहित नाही किती लोक धोका पत्करण्यास तयार आहेत आणि गुंतवणूक करतील... आम्ही व्याजदर कपातीचा मुद्दा मांडला. मजूमदार यांच्या म्हणण्यानूसार बैठकीत जीएसटीच्या मुद्यावर चर्चा झाली. अर्थमंत्र्यांनी विश्वास दिला आहे की लवकरच जीएसटी लागू होईल. मात्र भू-संपादन विधेयकावर कोणतीही चर्चा झाली नाही.
बैठकीचा उद्देश
सरकारचे मत आहे की जागतिक मंदीतून भारतासाठी काही फायद्याच्या गोष्टी निघू शकतात, त्यावर अधिक काम करण्याची गरज आहे. पंतप्रधानांची इच्छा आहे की चीनच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेचा भारताना फायदा उचलला पाहिजे. भारताला या क्षेत्रात नेतृत्व करण्याची हिच खरी संधी आहे. या बैठकीत भू-संपादन आणि जीएसटी विधेयकावरही चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीत सहभागी सदस्यांना सुरुवातीला तीन मिनीट बोलण्याची संधी दिली गेली.
कोण-कोण आले
- रिलायन्स इंडस्ट्रीचे चीफ मुकेश अंबानी
- टाटा ग्रुपचे चेअरमन सायरस मिस्त्री
- भारती एअरटेलचे चीफ सुनील भारती मित्तल
- एस्सार ग्रुपचे शशि रूईया
- रिलायन्स ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानी
- अडाणी ग्रुपचे चीफ गौतम अडाणी
- ICICI बँकेच्या सीईओ चंदा कोचर
- एसबीआयच्या चेअरमन अरुंधती भट्टाचार्य
- महिंद्र ग्रुपचे चेअरमन आणि एमडी आनंद महिंद्रा
- आदित्य बिर्ला ग्रुपचे प्रमुख कुमार मंगलम बिर्ला

पुढील स्लाइडमध्ये पाहा, बैठकीला उपस्थित उद्योगपती आणि अधिकारी