Home »National »Delhi» Amid Standoff At Doklam, Sushma Swaraj Meets Bhutan Foreign Minister Damcho Dorji

भूतानच्या परराष्ट्र मंत्र्यांना भेटल्या सुषमा स्वराज; डोकलामबद्दल झाली सकारात्मक चर्चा

दिव्य मराठी वेब टीम | Aug 11, 2017, 18:05 PM IST

काठमांडू - सिक्किम सेक्टरमध्ये डोकलामवर चीनशी सुरू असलेल्या वादादरम्यान सुषमा स्वराज यांनी भूतानच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली. सुषमा येथे बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल अँड इकॉनॉमिक कॉर्पोरेशन इन साऊथ एशिया अँड साऊथ ईस्ट एशिया (BIMSTEC) मध्ये सहभागी झाल्या. भूतानचे संयुक्त सचिव म्हणाले की, या भेटीचा परस्पर सहकार्य वाढवण्याचा उद्देश आहे. भारताच्या प्रीती सरन म्हणाल्या, या भेटीमुळे सकारात्मकता तयार झाली आहे. तथापि, सिक्कीममधील डोकलाममध्ये चीनला रस्ता बनवायचा आहे. डोकलामच्या पठारावरच चीन, सिक्कीम आणि भूतानच्या सीमा मिळतात. या परिसरात चीन आणि भारताचे सैन्य तब्बल दोन महिन्यांपासून आमनेसामने आहे.
जवळचा मित्र अन् शेजारी आहे भूतान
साउथ एशिया आणि साऊथ ईस्ट एशियामध्ये सहयोग वाढवण्यासाठी BIMSTEC ची निर्मिती झाली.
- BIMSTEC मध्ये बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड, भूतान आणि नेपाळचा समावेश होतो.
- परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट केले की, जवळचा मित्र आणि शेजाऱ्याला भेटण्याची वेळ. विदेश मंत्र्यांनी भूतानच्या फॉरेन मिनिस्टर दामेचो दोरजी यांची भेट घेतली.

Next Article

Recommended