आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amir Khan Will Not Be A Ambassador Of Road Safety Also

"अतिथी देवो भव'नंतर अाता रस्ते सुरक्षेतही आमिर खान ब्रँड अॅम्बेसेडर नसतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारच्या वतीने गेल्या दहा दिवसांत दोन प्रचार अभियानांतून अामिर खान यांना दूर करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर अमिताभ बच्चन आता ‘अतिथी देवो भव’चे ब्रँड अॅम्बेसेडर होण्याची चर्चा सुरू झाली.
या संदर्भात "दिव्य मराठी' नेटवर्कने अामिरसोबत चर्चा केली त्या वेळी त्यांनी सांगितले की, अतिथी देवो भव:, कुपोषण आणि स्वच्छता तसेच सेनिटेशन कॅम्पेनसाठी त्यांनी भारत सरकारसाठी काम केले आणि त्यासाठी सरकारचा एक रुपयाही घेतला नाही. ज्या देशाने मला सर्वकाही दिले त्यासाठी मी काहीही केले तरी कमीच आहे. याच भावनेतून मी या जाहिराती केल्या असून पुढील काळात केव्हाही माझी गरज असेल तेव्हा मी उपलब्ध होईल. कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिल्यावर आपण कधीच पैसे घेतले नसल्याचे आमिर यांनी सांगितले.

आमिर खान वर्षात केवळ एक किंवा दोनच व्यावसायिक जाहिराती करतात, ज्यासाठी ते वीस ते तीस कोटी रुपये घेतात. मात्र, भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारच्या एकाही जाहिरातीसाठी त्यांनी पैसे घेतलेले नाहीत. त्यांना या जाहिरात कॅम्पेनमधून का काढण्यात आले, असे विचारल्यावर त्यांनी सांगितले की, हा सरकार आणि मंत्रालयाचा निर्णय असून त्यात मी हस्तक्षेप करणार नाही. अामिर सध्या त्यांचा पुढचा चित्रपट "दंगल'च्या शूटिंगसाठी लुधियानामध्ये असून हा चित्रपट जूनपर्यंत पूर्ण होईल. शक्यतो हा चित्रपट याच वर्षीच्या शेवटपर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.

या पूर्ण प्रकरणात एक मजेशीर तथ्य हे आहे की, गेल्या काही दिवसांपासून इन्क्रेडिबल इंडियाचा अामिर यांचा करार संपला असल्याचे सांगण्यात येत आहे. खरे तर अामिर यांनी ‘अतिथी देवो भव’चे कॅम्पेन केले होते आणि इन्क्रेडिबल इंडिया पूर्णपणे वेगळे कॅम्पेन होते. यूपीए सरकारने २००८ मध्ये ‘अतिथी देवो भव’, विदेशी पर्यटकांची लुबाडणूक, महिला पर्यटकांवरील अत्याचार आणि दुर्व्यवहाराच्या घटना वाढल्यानंतर याला सुरुवात केली होती.