आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ममता बॅनर्जींना दिल्लीत लोखंडी रॉडने मारण्याचा प्रयत्न; माँटेकसिंगांकडून माफी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- गुजरातचे सीएम नरेंद्र मोदी मंगळवारी कोलकात्यात होते तर, पश्चिम बंगालच्या सीएम ममता बनर्जी देशाची राजधानी दिल्‍ली होत्या. कोलकात्यात पोहचलेल्या मोदींनी आपल्या भाषणात ममताचे कौतूक केले तर नियोजन आयोगाच्या कार्यालयाबाहेर ममता बनर्जी आणि त्यांच्या टीमला जबरदस्‍त विरोध दर्शविण्यात आला. एसएफआयच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालचे अर्थमंत्री अमित मित्रा यांच्यासोबत धक्काबुक्की केली. एसएफआयचे कार्यकर्ते आपला सहकारी विद्यार्थी नेता सुदीप्‍तो घोष यांच्या मृत्यूच्या घटनेचा विरोध करीत होते. नियोजन आयोगाच्या बाहेर एसएफआय कार्यकर्त्यांनी अमित मित्रांना मारहाण करीत त्यांचा कुर्ता फाडला. प्रदर्शनका-यांची पोलिसांसोबतही झडप झाली कारण ते करीत असलेला विरोध-प्रदर्शन रोखू राहत होते.

मित्रासोबत असलेल्या सीएम ममता बनर्जी यांनी प्रदर्शनका-यांना धुडघूस घालणारे संबोधले तसेच आता परत दिल्लीत येणार नसल्याचे सांगितले. ममता यांनी डाव्या पक्षांवर आरोप करीत ते लोक घाणेरडे राजकारण खेळत असल्याची टीका केली. ममता म्हणाल्या, एसएफआय कार्यकर्त्यांच्या हातात लोखंडी रॉड होते तसेच त्यांनी माझ्यावर हल्ला करण्याचा त्यांचा डाव होता. ममतांनी डाव्या पक्षांवर प्रहार करताना म्हटले की, ते माझी हत्या घडवू शकतात पण मला बंगालचा विकास करण्यापासून रोखू शकत नाहीत. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष माँटेकसिंग अहलुवालिया यांनी ममता आणि त्यांच्या सहका-यांसोबत झालेल्या घटनेबाबत माफी मागितली आहे. माँटेकसिंग आणि ममता यांच्या बैठकीला उपस्थित असलेले केंद्रीय मंत्री राजीव शुक्‍ला यांनी म्हटले आहे की, नियोजन आयोगाच्या कार्यालयाबाहेर प्रदर्शन करणा-या एसएफआय कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिस कडक कारवाई करतील.