आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amit Shah Addressing Press Conference On Modi Govt 3 Year: Rajnikanth, PMFBY, OROP, BHIM App

रजनिकांत पक्षात येणार असतील तर त्यांचे स्वागतच- भाजपाध्यक्ष अमित शहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - एनडीए सरकारने देशात अमुलाग्र बदल केले आहेत. देशाचा मान वाढवला असून परिवारवाद संपवण्यात यश आल्याचे मत भाजपचे अध्यक्ष  अमित शहा यांनी व्यक्त केले. नरेंद्र मोदी सरकारला ३ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ते पत्रकारांशी बोलत होते. मेगा स्टार रजनिकांत भाजपमध्ये येणार असतील तर त्यांचे स्वागत असल्याचे ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. 
जनतेचा विश्वास वाढला आहे आणि परदेशातही देशाची प्रतिमा बदलली आहे. अनेक वर्षांचे काम फक्त तीन वर्षात केले. त्यामुळेच 'सबका साथ सबका विकास' होऊ शकला, असा दावा भाजपाध्यक्षांनी केला. आमच्या सरकारवर विरोधक देखिल टीका करू शकले नसल्याचे शहा म्हणाले. 
बातम्या आणखी आहेत...