आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहा पुन्हा भाजपचे अध्यक्ष, अडवाणी-जोशी बैठकीपासून लांबच

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांच्याकडे दुसऱ्या कार्यकाळासाठी पुन्हा निर्विवादपणे पक्षाची धुरा सोपवण्यात आली आहे. तीन तासांच्या निवड प्रक्रियेत ५१ वर्षीय शहा यांच्या बाजूने १७ नामांकने आली. पक्षाचे उपाध्यक्ष अविनाश राय खन्ना यांनी पक्षाध्यक्षपदी शहा यांची बिनविराेध निवड झाल्याची घोषणा केली.

शहा यांचा नावाचा प्रस्ताव ठेवणाऱ्यांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. कुणीही त्यांच्या नावास आव्हान दिले नाही. मार्गदर्शक मंडळात सहभागी असलेले लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांनी मात्र बैठकीपासून पाठ फिरवली.
शहा हे प्रथमच पूर्णवेळ अध्यक्ष बनले आहेत. यापूर्वी ते राजनाथ सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण करत होते. केंद्रीय गृहमंत्री बनल्यामुळे राजनाथ यांना हे पद सोडावे लागले होते. भाजपाध्यक्षांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असतो. २८ जानेवारी होणाऱ्या भाजपच्या संसदीय बोर्डाच्या बैठकीत शहा यांचे स्वागत आणि निवडीवर औपचारिक शिक्कामोर्तब केले जाईल.