आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amit Shah For BJP President Post News In Marathi

भाजपच्या अध्यक्षपदासाठी अमित शहा यांच्या नावाचा विचार, इतरही नेते मैदानात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांना केंद्रीय गृहमंत्रालय सोपविण्यात आले आहे. त्यामुळे भाजपचे अध्यक्षपद सध्या रिक्त आहे. भाजपच्या अध्यक्षपदावरुन जोरदार चर्चा सुरू झाली असल्याचे दिसून येते. दरम्यान, भाजपचे उत्तर प्रदेश प्रभारी आणि नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय अमित शहा यांची अध्यक्षपदी वर्दी लागण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
अमित शहा यांनी भाजपला उत्तर प्रदेशात घवघवीत यश मिळवून दिले. यामुळे नरेंद्र मोदी यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न पूर्ण होण्यात कोणतीही अडचण आली नाही. तरीही अमित शहा यांचा केंद्रीत मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला नाही, की गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली नाही. यामुळे त्यांच्याकडे भाजपचे अध्यक्षपद जाण्याची दाट शक्यता असल्याचे दिसून येते.
भाजपचे गुजरातमधील पदाधिकारी ओम माथूर यांच्या नावाचाही अध्यक्षपदासाठी विचार करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. काही दिवसांपूर्वी पक्षाचे सरचिटणीस जे. पी. नंदा यांचे नाव आघाडीवर होते. अजूनही त्यांच्या नावावर विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
अमित शहा यांना भाजपचे अध्यक्षपद देण्यासंदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही अनुकूलता दर्शविली आहे. उत्तर प्रदेशातून भाजपला तब्बल 71 जागा मिळाल्या. त्यामुळे भाजपला एकूण 282 जागांपर्यंत मजल मारता आली. याचे श्रेय नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना जाते.