आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरद यादव यांच्या जागी आरसीपी सिंह JDU संसदीय दलाचे नेते; हे करणे गरजेचे होते: JDU

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नितीश कुमार यांच्यावर नाराज असलेले जदयूचे वरिष्ठ नेते शरद यादव यांची जदयू संसदीय दलाच्या नेतेपदावरून हकालपट्टी झाली आहे. त्यांच्या जागी आरसीपी सिंह यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
-शुक्रवारी जेडीयू प्रमुख नितीश कुमार म्हणाले होते की, त्यांनी (शरद यादव) त्यांना पाहिजे तिथे जावे, पक्षाने आपला निर्णय घेतला आहे. दुसरीकडे, अमित शहा यांनी नितीश यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण दिलेले अाहे. शहा यांनी शुक्रवारी त्यांना दिल्लीतील आपल्या घरी चहापानावर बोलावले. दोन्ही नेत्यांमध्ये दीर्घ चर्चा झाली.
-तत्पूर्वी, नितीश यांनी 28 जुलैला राजद-काँग्रेस महाआघाडीमधून स्वत:ला वेगळे केल्यानंतर बिहारमध्ये भाजपसह नवे सरकार स्थापन केले. 4 वर्षांनंतर नितीश कुमार यांनी पुन्हा एनडीएमध्ये पुनरागमन केले.
 
अहमद पटेल यांचे अभिनंदन
- जदयू नेते वशिष्ठ नारायण सिंह म्हणाले, त्यांना (शरद यादव) हटवलेले नाही, रिप्लेस केले आहे. त्यांच्या सध्याच्या अॅक्टिव्हिटीज पाहता हे करणे गरजेचे होते.
- दुसरीकडे, शहा यांच्या आमंत्रणावर शरद म्हणाले, मला कोणीही कॉमेंट करायची नाही. इतरांबाबत बोलू नका, मी पब्लिक रॅलीमध्ये फक्त जनतेशी बोलायला आलो आहे.
- गुजरात राज्यसभा इलेक्शनमध्ये जदयूच्या एका MLAने पक्षाचा आदेश डावलून काँग्रेस उमेदवार अहमद पटेल यांना मतदान केले होते. नंतर शरद यांनी पटेल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले होते. या घटनाक्रमानंतर नितीश यांनी गुजरातच्या पक्ष प्रभारींना बरखास्त केले होते, ते शरद यांच्या जवळचे होते. यानंतरच शरद यांच्यावर कारवाईचा अंदाज व्यक्त केला जात होता.
बातम्या आणखी आहेत...