आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांची बिनविरोध निवड, नाही आले अडवाणी- जोशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा अमित शहांची गळ्यात पडली आहे. शनिवारी त्यांच्या पहिल्या टर्मचा कार्यकाळ संपला होता. ते दीड वर्षे पक्षाध्यक्ष होते. आता त्यांना पूर्ण तीन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. 2019 पर्यंत ते पक्षाध्यक्ष असतील. 2017 मध्ये उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुक आहे, हे त्यांच्या आगामी कार्यकाळातील सर्वात मोठे आव्हान असणार आहे. दरम्यान, आज भाजप मुख्यालयात सर्व नेते कार्यकर्ते हजर असताना ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी गैरहजर होते.

आमित शहांनी आज सकाळी अध्यक्षपदासाठी अर्ज सादर केला. यावेळी पक्षाचे सर्व मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. 2014 मध्ये राजनाथसिंह केंद्रीय मंत्री झाल्यानंतर अध्यक्षपदाची धुरा शहांच्या खांद्यावर आली होती. त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मीरमध्ये पक्षाला विजय मिळाला. तर दिल्ली आणि बिहारमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यांनी उत्तर प्रदेश प्रभारी असताना पक्षाला राज्यातून लोकसभेच्या ऐतिहासिक 73 जागांवर विजय मिळवून दिला होता.

शहांसमोरील आव्हाने
- येणारा काळ भाजपसाठी मोठा कठीण असण्याची शक्यता आहे. त्याचा सामना शहांनाही करावा लागेल.
- याच वर्षी पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू येथे विधानसभा निवडणूक आहे. त्यानंतर पंजाब आणि उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्या नेतृत्वाचा कस लागेल.
- सरकारची कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर असेल.

व्यवसायिक कुटुंबातून आले शहा
शहा यांचा जन्म प्लास्टिक पाइप निर्मीती व्यवसाय करणाऱ्या कुटुंबात 1964 मध्ये झाला. त्यांनी गुजरातमधील मेहसाणा येथे शिक्षण घेतले. त्यानंतर अहमदाबादमध्ये गेले. तिथे बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी वडिलांना व्यवसायात मदत करण्यास सुरुवात केली. शहा स्टॉक ब्रोकर आणि सहकारी बँकेचे अध्यक्ष देखिल राहिले आहेत.
मोदींसोबत पहिली भेट 1982 मध्ये
- मोदी आणि अमित शहा यांची पहिली भेट 1982 मध्ये झाली होती. तेव्हा मोदी अहमदाबादमध्ये संघासाठी युवकांमध्ये काम करत होते.
- दोघांनी एकत्रितरित्या संघ आणि भाजपच्या इतर संघटनांसाठी काम केले.
- 1995 मध्ये भाजपची गुजरातमध्ये प्रथम सत्ता आली. त्या काळात मोदी आणि शहा गावागावात फिरून पक्षाचा प्रचार करत होते. मोदींनी त्यांना राज्याती क्रमांक दोनचा नेता म्हणून पुढे केले होते.
- 1995 मध्ये केशुभाई पटेल गुजरातचे मुख्यमंत्री झाले. तेव्हा त्यांना मोदींसोबत शहांचे वाढते संबंध आवडले नाही.
- त्यामुळे 1997 मध्ये विधानसभा पोटनिवडणूक आमि 1998 मध्ये विधानसभा निवडणुकीत विजयी होऊनही त्यांच्याकडे महत्त्वाचे पद आले नाही.
- 2001 मध्ये नरेंद्र मोदींकडे गुजरात सरकार आले तेव्हा त्यांनी शहांना सत्तेत सहभागी करुन घेतले. मोदी मुख्यमंत्री होते तर त्यांच्या सरकारमध्ये शहा गृह राज्यमंत्री होते.
पुढील स्लाइडमध्ये
>> शहांचे रिपोर्ड कार्ड
>> आगामी दोन वर्षांत कोण-कोणत्या राज्यात निवडणुका