आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमित शाहांच्या टीमवर दिसेल संघाचा प्रभाव; सुरेश सोनी OUT तर कृष्ण गोपाल IN?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे (भाजप) नवनियुक्त अध्यक्ष अमित शाह यांची टीम जवळपास निश्चित झाली आहे. उल्लेखनिय म्हणजे अमित शाह यांच्या टीमवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोठा प्रभाव दिसणार आहे. संघातून भाजपमध्ये आलेल्या सदस्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच युवा नेत्यांना महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्याची शक्यता नाकारता येत नाही. एका वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, केंद्रात सत्ता काबिज केल्यानंतर भारतीय जनता पक्षाने अमित शाह यांच्या नेतृत्त्वात टीममध्ये मोठे फेरबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. संघ परिवारात प्रभारी आणि भाजपचे समन्वयक असलेले सुरेश सोनी यांचा पायउतार होण्याचीही शक्यता आहे. सुरेश सोनी यांच्याकडे असलेली जबाबदारी कृष्ण गोपाल यांच्याकडे सोपवण्याबाबतही हलचाली सुरु झाल्या आहेत. कृष्ण गोपाल हे संघाचे महासचिव आहेत.
अमित शाह यांच्या टीममध्ये संघ नेता शिव प्रकाश, व्ही.सतीश आणि सौदान सिंह यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. संघ आणि भाजपमध्ये उत्तम समन्वय राखला जाण्यासाठी राम माधव यांना टीममध्ये स्थान देण्यात आले आहे. शाह यांचा टीममध्ये संघाचे चार सदस्य असतील.

50 वर्षीय अमित शाह यांच्या मते, टीममध्ये युवा नेत्यांचा समावेश असेल. पक्षाच्या बळकटीसाठी युवा नेत्यांची भूमिका महत्त्वाची आहे. देशातील चार राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रमुखपदाची जबाबदारी योग्य व्यक्तीकडे दिली जाणार आहे.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, संसदीय मंडळात युवा नेत्यांना महत्वपूर्ण पद दिले जाणार आहे. शाह यांच्या टीममध्ये तरुण चेहर्‍यांचा समावेश करण्यात येणार आहे. उल्लेखनिय म्हणजे शाह यांच्या टीममध्ये 33 टक्के महिला पदाधिकारी असतील. नवी टीममध्ये राम माधव, वरूण गांधी आणि राजीव प्रताप रूडी यांचा समावेश केला जाणार असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले. पश्चिम दिल्लीचे खासदार परवेश वर्मा यांना भाजपच्या यूथ विंगचे अध्यक्षपद दिले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपच्या नव्या संसदीय मंडळाची घोषणा 17 ऑगस्टला होऊ शकते. उपाध्यक्षपदासाठी मुरलीधर राव यांचे तर व्ही सतीश यांचे संयुक्त सचिवपदासाठी नाव चर्चेत आहे.