आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amit Shah News In Marathi, BJP President, Divya Marathi

अमित शहांचे ‘मिशन महाराष्‍ट्र’, राज्यातील भाजप नेत्यांशी निवडणुकीवर 3 तास केली चर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे राष्‍ट्रीय अध्यक्ष अमित शहा राज्यातील विधानसभा निवडणुकीत पक्षाचे नेतृत्व करणार आहेत. राज्यातील 18 नेत्यांनी मंगळवारी शहा यांच्याशी 3 तास चर्चा केली. तेव्हा शहा यांनी त्यांची नेतृत्वाची मागणी मान्य केल्याचे सूत्रांनी सांगितले. तथापि, जागावाटपावर चर्चा झाली नसल्याचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

फडणवीसांसह एकनाथ खडसे, विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार हे होते. पक्षाची भूमिका ठरवून महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करू, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

शहा शुक्रवारी नागपुरात : शहा शुक्रवारी नागपुरात सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतील. त्यानंतर भाजप-संघाच्या समन्वय समितीची 19 व 20 रोजी बैठक आहे.
या बैठकीला भागवत, फडणवीस, खडसे, तावडेंसह पंकजा पालवे हजर राहतील.

महाराष्‍ट्र मेरा ससुराल, हर हाल में जितना है : शहा
1. शहर, गाव, प्रभागात कार्यकर्त्यांचे नेटवर्क उभारून जनसंपर्क वाढवा.
2. निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार पुढे करणार नाही.
3. जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री, त्यामुळे संख्याबळ वाढवण्याचे पाहा.

राज्यातील प्रत्येक मतदारसंघात केंद्रीय मंत्री
1. प्रत्येक मतदारसंघात एक दिवस केंद्रीय मंत्री येणार
2. येत्या 25 जुलैपर्यंत बूथरचना पूर्ण करण्याच्या सूचना
3. भाजप विजयी न झालेल्या 19 जागांवर विशेष लक्ष देणार