आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amit Shah PC Live On Surgical Strike In POK And Rahul Gandhi\'s Latest Statement

दलाली शब्द काँग्रेसच्या रक्तात भिनलेला, अमित शहांचा राहुल गांधींवर पलटवार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मोदी सरकार शहिदांच्या रक्ताचे राजकारण करत आहे, असा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. त्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी दलाली ही काँग्रेसच्या रक्तात भिनलेली आहे, असा पलटवार केला आहे. त्यासोबतच राहुल गांधी यांनी बटाट्याच्या कारखान्यावर लक्ष देण्याचा टोलाही शहांनी लगावला.
'पाकिस्तानमध्ये पसरलेली अस्थिरता सर्वात मोठा पुरावा'
- लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे पुरावे सर्वप्रथम आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मागितले होते.
- त्यानंतर सोशल मीडियामध्ये पाकिस्तानात केजरीवाल ट्रेंड करु लागले होते. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा कोणाला फायदा झाला हे देशाच्या लक्षात आले.
'राहुल गांधींनी मोठ्या प्रश्नांकडे लक्ष देऊ नये'
- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सर्जिककल स्ट्राइक करुन मोदी सरकार शहीदांच्या रक्ताची दलाली करत असल्याचा आरोप केला होता.
- त्याला उत्तर देताना शहा म्हणाले, 'त्यांनी जवानांचा अवमान केला आहे. राहुल यांचे वक्तव्य काँग्रेसची मानसिकता दाखवणारे आहे.'
- 'मी त्यांना प्रश्न विचारतो, की बोफोर्स पासून टूजी पर्यंत कोणी दलाली केली. दलाली हा शब्द त्यांच्या मनात रुजलेला आहे. मात्र त्यांनी त्याचा वापर चुकीच्या ठिकाणी केला.'
- राहुल यांचा मोदींना विरोध असू शकतो, ते त्यांच्याबद्दल मौत का सौदागर, जहर की खेती आणि आता शहीदांच्या रक्ताची दलाली असे शब्दप्रयोग केले आहेत. मात्र त्यांनी जेव्हा मौत के सौदागर म्हटले तेव्हा गुजरातमध्ये दोन तृतीयंश बहुमत मिळाले होते.
- सर्जिकल स्ट्राइकनंतर पाकिस्तानात जो गोंधळ उडाला आहे, तेथील अस्थिर परिस्थितेचे जरी पुरावे मागणाऱ्यांनी विश्लेषण केले असते तर त्यांना उत्तर मिळाले असते, असे शहा म्हणाले.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...