नवी दिल्ली - भाजप अध्यक्ष अमित शहा आणि स्मृती इराणी यांनी शुक्रवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ ग्रहण केली. स्मृती इराणी यांनी संस्कृतमधून शपथ घेतली. नुकतीच गुजरात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक झाली होती. त्यात भाजपने दोन तर काँग्रसचे अहमद पटेल एका जागेवर विजयी झाले होते. शहा आणि इराणी यांना प्रत्येकी 46 मते मिळाली होती, तर अनेक दावे प्रतिदाव्यानंतर अहमद पटेल यांना तिसऱ्या जागेवरुन विजयी घोषित करण्यात आले होते.
सुषमा, उमा, हर्षवर्धन यांनीही घेतली संस्कृतमध्ये शपथ
- 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या सुषमा स्वराज, उमा भारती आणि हर्षवर्धन यांनीही संस्कृतमध्ये शपथ घेतली होती.
- त्यावेळी डी.व्ही. सदानंद गौडा, अनंत कुमार आणि जी.एम. सिद्धेश्वर यांनी कन्नड तर, सर्वानंद सोनोवाल यांनी आसामी आणि जुआल ओराम यांनी उडिया भाषेत शपथ ग्रहण केली होती.
गुजरातमध्ये मतमोजणीचा 8 तास चालला ड्रामा
- गुजरातमध्ये राज्यसभेच्या 3 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत अहमद पटले यांच्या जागेवरुन वाद निर्माण झाला होता. 8 ऑगस्टला मतमोजणीवेळी राजकीय ड्रामा रंगला होता. 8 तास मतमोजणी थांबवण्यात आली होती.
- उशिरा रात्री निवडणूक आयोगाने काँग्रेसच्या आक्षेपानंतर काँग्रेसच्या दोन आमदारांचे मत रद्द केले, त्यानंतर मतमोजणी सुरु झाली होती. त्यानंतर काँग्रेस उमेदवार अहमद पटेल विजयी झाले होते. त्यांनी भाजपच्या बलवंत सिंह यांना पराभूत केले.