आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Inside Photos: अमित शहांच्या मुलाच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले दिग्गज

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रविवारी रात्री दिल्लीत अमित शहा यांच्या मुलाच्या विवाहानंतर रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यासह राजकारणातील अनेक दिग्गज उपस्थित होते. हा समारंभ दिल्लीच्या अशोका रोड येथील बंगला क्रमांक 9 येथे आयोजित करण्यात आला होता.
फोटो - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोहळ्याला उपस्थिती होती.
सोहळ्यासाठी सुमारे 300 हून अधिक लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. त्यात रामदेव बाबा, शरद पवार, मुलायम सिंह, जीतनराम मांझी, दिनेश त्रिवेदी, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती यांची उपस्थिती होती.

त्याआधी अहमदाबाद येथेही लग्नाच्या रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. अमित शहा यांच्या मुलाचा विवाह त्याची मैत्रिण ऋषिता हिच्याबरोबर झाला आहे. 10 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये हा विवाह सोहळा झाला होता. त्यानंतर शुक्रवारी अहमदाबादच्या कर्णावती क्लबमध्ये रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते.
पुढील स्लाइडवर पाहा, दिल्लीत अमित शहा यांच्या मुलाच्या रिसेप्शनचे PHOTO