आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटा बंद झाल्याने मायावती, राहुल, मुलायम, केजरीवाल यांना अडचण का, अमित शहांचा सवाल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमित शहांनी शुक्रवारी केंद्र सरकारच्या 500-1000 च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. भाजपाध्यक्ष शहा म्हणाले की, काळ्या पैशाच्या विरोधात एक ठोस पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे सामान्य नागरिकांना घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. त्याचवेळी या निर्णयावर प्रश्नचिन्हं उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर शहा यांनी हल्ला चढवला. या निर्णयाने राहुल, मुलायम, केजरीवाल आणि मायावतींना का त्रास होतोय? त्यांचा काळ्या पैशाला पाठिंबा आहे का.. असे प्रश्न शहा यांनी उपस्थित केले.

शहा म्हणाले, काळा पैसा असेल त्यांना त्रास होईल..
- दिल्लीत एका प्रेस कॉन्फरन्समध्ये शहा म्हणाले, या निर्णयानंतर प्रामाणिकपणे कर भरणारे आनंदी आहेत, केवळ काळा पैसा बाळगणाऱ्यांना धक्का बसला आहे.
- मोदी सरकारच्या काळ्या पैशाच्या विरोधातील या निर्णयामुळे काही राजकीय पक्षांना का त्रास होतो, हेच लक्षात येत नसल्याचे शहा म्हणाले.
- सपा, बसपा, काँग्रेस आणि आम आदमी पार्टी काळ्या पैशाच्या विरोधात आहे की, सपोर्टमध्ये हे मला विचारायचे आहे.
- राहुल, मायावती, मुलायम आणि केजरीवाल यांना त्रास का होत आहे.

बसपासाठी आर्थिक आणीबाणी
- देशावर आर्थिक आणीबाणी लादल्याच्या आरोपावर उत्तर देताना शहा यांनी हे पाऊल बसपासाठी आर्थिक आणीबाणी असे असे म्हटले आहे.
- सपा, बसपा, कांग्रेस आणि आम आदमी पार्टीने ते काळाबाजार करणाऱ्यांच्या पाठिशी आहेत की त्यांच्या विरोधात हे स्पष्ट करावे असेही शहा म्हणाले आहेत.
- मायावती यांनी गुरुवारी म्हटले होते की, भाजपने स्वतःची व्यवस्था केली तर निवडणुकांच्या आधीच आर्थिक आणीबाणी लादली.
- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि TMC प्रमुख ममता बॅनर्जींनी हे पाऊल गरीबांच्या विरोधी असल्याचे म्हटले होते. त्यावर याचे स्पष्टीकरण मायावतीच देऊ शकतील असे शहा म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...