आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इशरत जहाँ प्रकरण : अमित शहा यांची चौकशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - इशरत जहाँ बनावट चकमक प्रकरणी नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय अमित शहा यांची शनिवारी सीबीआयकडून चौकशी करण्यात आली . आयपीएस अधिकारी डी.जी. बंजारा यांच्या आरोपानंतर शहा यांची चौकशी झाली आहे.
तुरूंगात असलेले निलंबित अधिकारी बंजारा यांनी सरकारवर अनेक आरोप केले होते. पोलिसांवर राज्य सरकारची फार जवळून नजर होती. साबरमती तुरूंगात सीबीआयने बंजारा यांची चौकशी केली होती. त्यांनी पत्रात केलेल्या आरोपाचांच चौकशीत पुनरूच्चार केला होता. विविध चकमकीत आरोपी असलेले अधिकारी सरकारच्या धोरणांची अंमलबजावणी करत होते, असा आरोप बंजारा यांनी केला.
दरम्यान, बनावट चकमक प्रकरणात सीबीआय पुरवणी आरोपपत्र दाखल करणार आहे. चकमक प्रकरणात कारस्थान आणि गुजरात सरकारच्या अधिकार्‍यांकडून करण्यात आलेली सारवासारव याचा तपशील देण्यात येणार आहे. शहा हे भाजपचे उत्तरप्रदेशचे प्रभारी आहेत. शहा यांच्या विरोधात सोहराबुद्दीन शेख व तुलसीराम प्रजापती बनावट चकमक प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. त्यांना जुलै 2010 मध्ये अटक करण्यात आले होते. सध्या त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.