आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित शहांचे मिशन-2019 सुरू; लोकसभेत 360वर जागा जिंकण्याचे लक्ष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी गुरुवारी ज्येष्ठ मंत्री तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक
घेऊन ‘तयारीला लागा’ अशी सूचना केली. आगामी निवडणुकीत ३६०हून अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. या बैठकीला भाजपचे एकूण ३१ नेते उपस्थित होते. सूत्रांनुसार, ज्या जागांवर भाजप गेल्या वेळी पराभूत झाला होता त्यासंबंधी एक प्रेझेंटेशनही सादर करण्यात आले. याच मतदारसंघांत येत्या दोन वर्षांत अधिक भर देण्याच्या सूचना शहा यांनी केल्या आहेत.

महाराष्ट्र, कर्नाटक वेगळे : शहा यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक ही राज्ये वेगळी ठेवली आहेत. तामिळनाडू-पुद्दुचेरीच्या ४२ आणि ओडिशाच्या २१ जागा हे प्रमुख लक्ष्य आहे. या जागा १२३ होतात. यातून ११७ ते ११९ जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे.

किनारपट्टीची राज्ये; ११७ जागांचे टार्गेट
सन २०१९च्या निवडणुकीत ३६० जागा जिंकण्याचे अमित शहा यांचे ध्येय आहे. गेल्या लोकसभा निवडणूक निकालांचा विचार करता यात ७८ जागा अधिक आहेत. या रणनीतीवर वर्षभरापासून काम सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून जागा वाढवण्यासाठी सर्वात सोपी संधी व शक्यता असलेल्या ओडिशामध्ये भाजप कार्यकारिणीची बैठक झाली होती. आता आगामी बैठक अशाच एखाद्या किनारपट्टीवरील राज्यांत आयोजित करण्याचे नियोजन आहे. शक्यतो आंध्र प्रदेशात ही बैठक घेतली जाईल. अशा राज्यांमध्ये ११७ ते ११९ जागा जिंकण्याचे लक्ष्य अमित शहा यांनी ठेवले आहे. यानुसार किनारपट्टीवरील राज्यांत पक्षाच्या हालचाली २००% वाढल्या आहेत.
 
ओडिशात धर्मेंद्र प्रधान यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली असून अरुणसिंह आणि जोएल ओराम त्यांच्यासोबत असतील. तर, प. बंगालमध्ये कैलाश विजयवर्गीय, रुपा गांगुली, हेमंत विश्वसरमा यांच्यावर जबाबदारी असेल. केरळमध्ये एम. राव, एस. गुरुमूर्ती, ओ. राजगोपाल यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तामिळनाडूत सी. टी. रवी, एस. गुरुमूर्ती आणि एम. राव यांच्यावर जबाबदारी असेल. या ठिकाणी राजकीय हालचालींचा अभ्यास करण्यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे. रोज यासंबंधीची माहिती शहा यांना दिली जाते.
 
गेल्या वेळी ज्या राज्यांत ९० टक्क्यांहून अधिक जागा जिंकल्या होत्या तेथे २०१९मध्ये २० टक्के जागांचे नुकसान होऊ शकते, असा भाजपचा अंदाज आहे. या जागांची भरपाई करण्यासाठी नव्या रणनीतीनुसार पक्षाने भारताच्या नकाशाचा एक डिजिटल स्वरूपात हार तयार केला आहे. बिहारपासून सुरू होत तो देशाच्या चारही भागातील जागांचा अंदाज घेतो. या आधारे किती जागा मिळतील याचा ठोकताळा मांडता येतो. बिहारमध्ये ४० पैकी २२ जागा भाजपकडे आहेत. जदयूशी आघाडीनंतर येथे २-३ जागा कमी होऊ शकतात. मात्र, इशान्य भारतात २५ पैकी २२ जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे. या नकाशानुसार पाहिले तर भाजपकडे सध्या ईशान्य भारत, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिशा, प. बंगाल आणि झारखंडमधील २३३ जागा आहेत. या ३०० पर्यंत वाढवण्याचे लक्ष्य आहे. आता यात मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि दिल्लीचा समावेश केला तर ४७ जागांची वाढ होते. यातील ४० जागा भाजपला अपेक्षित आहेत. या परिस्थितीत ३६० जागांचे लक्ष्य गाठणे पक्षाला कठीण वाटत नाही. प्रत्येक राज्यासाठी दोन केंद्रीय मंत्री, एक सरचिटणीस आणि दोन सचिवांवर जबाबदारी असेल. प्रत्येक राज्यात गुजरातच्या एका खासदारालाही नेमण्यात येईल. जेणेकरून भाजप अध्यक्षांच्या कोअर टीमला वास्तव स्थितीची माहिती मिळू शकेल.
बातम्या आणखी आहेत...