आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amit Shah\'s New BJP Team: 8 General Secretaries, Drops Varun Gandhi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमित शहांच्या नव्या टीमची घोषणा, आई मनेकामुळे वरुण गांधींना स्थान नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी त्यांच्या नव्या टीमची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 8 महासचिव आणि 11 उपाध्यक्ष असणार आहेत. जे.पी. नड्डा, राजीव प्रताप रुडी, मुरलीधर राव, राम माधव, सरोज पांडे, भुपेंद्र यादव, आर.एस.कटोरिया आणि राम लाल (संघटन) महासचिव असणार आहेत. पक्षाच्या घटनेनुसार आणखी दोन जणांना महासचिव करता येईल. मात्र, पक्षाचे माजी अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या टीममधील वरुण गांधी यांना शहांच्या टीममध्ये स्थान देण्यात आलेले नाही.

भाजपच्या उपाध्यक्षांमध्ये बी. दत्तात्रेय, बी.एस. येदियुरप्पा, सतपाल मलिक, मुख्तार अब्बास नकवी, पुरुषोत्तम रुपाला, प्रभात झा, रघुवर दास, किरण माहेश्वरी, रेनू देवी, दिनेश शर्मा यांचा समावेश आहे. नव्या संसदीय मंडळाची घोषणा देखील आजच होऊ शकते.

वरुण गांधी आणि रामेश्वर यांना डावलले
भाजपचे सुलतानपूर येथील खासदार वरुण गांधी यांना शहा यांच्या टीममध्ये जागा देण्यात आलेली नाही. यामुळे पक्षात तर्क - वितर्क लढवले जात आहे. भाजपच्या नव्या कार्यकारिणीत त्यांना स्थान दिले असते तर, उत्तर प्रदेश भाजपमध्ये वेगळाच संदेश गेला असता अशी, आता चर्चा आहे. त्याचे कारण, वरुण गांधी यांची आई आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी काही दिवसांपूर्वीच वरुण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री असते तर चांगले झाले असते, असे म्हटले होते. मनेका यांच्या या वक्तव्याने उत्तर प्रदेशमध्ये गटबाजीला सुरवात झाली होती. अमित शहा यांनी वरुण गांधींना जास्त महत्त्व न देता गटबाजीला वेसण घालण्याचा प्रयत्न केला आहे. वरुण गांधी लोकसभा प्रचारात नरेंद्र मोदींचे नाव घेणे टाळत होते. अनेकांनी त्यांना नव्या कार्यकारिणीत संधी न मिळण्याचे हे देखील कारण असल्याचे म्हटले आहे. रामेश्वर चौरसीया उत्तर प्रदेशमध्ये अमित शहांसोबत सह प्रभारी होते, तरीही त्यांचे नाव वगळल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.

भाजपची नवी कार्यकारिणी
उपाध्यक्ष- बंडारू दत्तात्रेय (तेलंगणा), बी.एस. येदियुरप्पा (कर्नाटक), सत्यपाल मलिक (उत्तर प्रदेश), मुख्तार अब्बास नकवी (उत्तर प्रदेश), पुरुषोत्तम रुपाला (गुजरात) प्रभात झा (मध्य प्रदेश), रघुवर दास (झारखंड), किरण माहेश्वरी (राजस्थान), विनय सहस्त्रबुद्धे (महाराष्ट्र), श्रीमती रेनू देवी (बिहार) आणि दिनेश शर्मा (उत्तर प्रदेश).
महासचिव-
जगत प्रकाश नड्डा (हिमाचल प्रदेश), राजीव प्रताप रूडी (बिहार), मुरलीधर राव (तेलंगणा), राम माधव (आंध्र प्रदेश), राम लाल संघटन महासचिव (दिल्ली), सरोज पांडे (छत्तीसगड), भूपेंद्र यादव (राजस्थान) आणि रामशंकर कठेरिया (उत्तर प्रदेश).

संयुक्त संघटन महासचिव
वी.सतीश (कर्नाटक), सौदान सिंह (छत्तीसगड), शिवप्रकाश (उत्तर प्रदेश) आणि बी.एल. संतोष (कर्नाटक).
प्रवक्ते
शाहनवाज हुसेन (बिहार), सुधांशु त्रिवेदी (उत्तर प्रदेश), मीनाक्षी लेखी (दिल्ली), एम.जे. अकबर (दिल्ली) विजय सोनकर शास्त्री, (उत्तर प्रदेश), ललिता कुमार मंगलम (तामीळनाडू), नलिन कोहली (दिल्ली), संबित पात्रा (ओडिशा), अनिल बुलानी (उत्तराखंड), जी.एस.एल. नरसिम्हा राव (आंध्र प्रदेश)
सचिव-
श्याम जाजू (महाराष्ट्र), अनिल जैन (दिल्ली), एच. राजा (तामीळनाडू), रोमेन डेका (आसाम), सुधा यादव (हरियाणा), पूनम महाजन (महाराष्ट्र), रामविचार नेताम (छत्तीसगड), अरुण सिंह (उत्तर प्रदेश), सिद्धार्थ नाथ सिंह (उत्तर प्रदेश), सरदार आर.पी. सिंह (दिल्ली), श्रीकांत शर्मा (उत्तर प्रदेश), ज्योति धुर्वे (मध्य प्रदेश), तरुण चुघ (पंजाब) आणि रजनीश कुमार (बिहार).

मोर्चा अध्यक्ष
महिला मोर्चा- विजया रहाटकर (महाराष्ट्र)
युवा मोर्चा -अनुराग ठाकुर (हिमाचल)
अनुसूचित जाती मोर्चा- दुष्यंत गौतम (दिल्ली)
अनुसूचित जमाती -फग्गन सिंह कुलस्ते (मध्य प्रदेश)
अल्पसंख्याक मोर्चा - अब्दुल रशीद अंसारी

कार्यालय सचिव
अरूण कुमार जैन