आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...म्हणून ‘ये प्यास है बडी’ म्हणणे अमिताभ यांनी थांबवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अमिताभ बच्चन यांचा पेप्सीसोबत 24 कोटींचा करार होता. सॉफ्टड्रिंक्स विषारी असतात असे एका मुलीला तिच्या शिक्षकाने सांगितले होते. आठ वर्षांनंतर त्या मुलीच्या सांगण्यावरून त्यांनी सॉफ्टड्रिंक्सची जाहिरात करणे बंद टाकले. अमिताभने ट्विटरवर केलेल्या या खुलाशावर ‘त्यांनी पेप्सीशी संबंध तोडल्यानंतर दहा वर्षांनी हा उल्लेख का केला?’ अशी टीका होत आहे. पण सॉफ्टड्रिंक्समुळे आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उन्हाळा तोंडावर आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘भास्कर’चा हा खास वृत्तांत...
सॉफ्टड्रिंक्सचा शरीरावर परिणाम
शहरांमध्ये सॉफ्टड्रिंक्सची वार्षिक विक्री काही लाख बाटल्यांच्या आसपास आहे. गावांमध्येही त्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. घशात उतरणा-या प्रत्येक बाटलीचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम एखाद्या संथगती विषापेक्षा तसूभरही कमी नाही. त्यावर दृष्टिक्षेप-
10 मिनिटांत
दहा चमचे साखर शरीरात साचते (दिवसभराच्या गरजेइतकी ). सॉफ्टड्रिंकमधील फॉस्फरिक आम्लामुळे त्याचा अतिरिक्त गोडवा जाणवत नाही, अन्यथा आपणास ओकारी झाली असती.
20 मिनिटांनंतर
रक्तशर्करा झपाट्याने वाढते, त्यामुळे एवढी साखर पचवण्यासाठी शरीराला इन्सुलिनच्या स्फोटासाठी बाध्य करते. यकृत त्यावर प्रतिक्रिया देते व साखरेचे फॅटमध्ये रूपांतर करते. म्हणजे स्थूलपणा वाढतो.
40 मिनिटांनंतर
सॉफ्टड्रिंकमधील कॅफिन आपल्या शरीरात मिसळते. त्यामुळे डोळ्याची बुब्बुळे विस्फारतात. रक्तदाब वाढतो. हृदयाला ऊर्जा देण्यासाठी यकृत साखर रक्तामध्ये पम्प करण्यास सुरूवात करते.
45 मिनिटांनंतर
हेरॉइनची नशा केल्यानंतर तयार होते अगदी तसेच डोपामाइन नावाचे रसायन सॉफ्टड्रिंक्समुळे शरीरात तयार होते. त्यामुळे मेंदूला प्रसन्नतेची जाणीव होते. मात्र हळूहळू सॉफ्टड्रिंकचे व्यसन जडते.
60 मिनिटांनंतर
फॉस्फरिक आम्ल शरीराला आवश्यक कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि झिंक आतड्यांत साचवून ठेवते. त्यावर कॅफिनचा
परिणाम होतो आणि लघवीवाटे शरीरातून बाहेर फेकतो. म्हणजे थकवा आणि घशाला कोरड.
31.5 ग्रॅम साखर असते 350 मि.लि. सॉफ्टड्रिंक्समध्ये
देशात सॉफ्टड्रिंकमध्ये मिसळली जाते दरवर्षी 4 लाख टन साखर
कोका-कोला आणि पेप्सी या देशातील सर्वात मोठ्या साखर खरेदीदार कंपन्या
कोका-कोला
2.5 लाख टन दरवर्षी
पेप्सी
1.5 लाख टन दरवर्षी
० अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या संशोधनानुसार, जगभरात दरवर्षी 1 लाख 80 मृत्यू सॉफ्टड्रिंकमुळे होतात.
० फोर्टिस रुग्णालयाच्या डॉ. नीतू तलवार यांच्या मते, सॉफ्टड्रिंकमधील कॅरेमल शरीराला इन्सुलिन प्रतिबंधक बनवते. त्यामुळे सॉफ्टड्रिंकमधील साखरेचे पचन होत नाही.
० लंडनच्या इम्पीरियल महाविद्यालयाच्या संशोधकांच्या मते, सॉफ्टड्रिंकच्या प्रत्येक बाटलीबरोबरच (350 मि.लि.) श्रेणी-2 चा मधुमेह होण्याचा धोका 20 टक्क्यांनी वाढतो. तंबाखू उत्पादनांप्रमाणेच सॉफ्टड्रिंकच्या बाटलीवरही आरोग्यविषयक इशारा द्यायला हवा, असे प्रा. निक वेअरहेम यांचे मत आहे.
‘ठंडा ठंडा’ का मतलब ..
11000 कोटी
रुपयांच्या सॉफ्टड्रिंक्सची देशात दरवर्षी विक्री
95% सॉफ्टड्रिंक्स पेप्सी आणि कोका-कोलाचे विकले जातात. आपण 58% कोका-कोला आणि 37% पेप्सी पितो.
अमेरिकेप्रमाणेच आपल्याही शहरातील विक्री घटली
आरोग्याविषयी जागृती वाढल्यामुळे असेल कदाचित, पण गेल्या तीन वर्षांत आपल्या शहरांतील सॉफ्टड्रिंक्सच्या विक्रीत 15 ते 20 टक्के घट झाली आहे. अमेरिकेतही हाच टेंड्र आहे. एका दशकापूर्वी तेथील बेवरेज बाजारातील सॉफ्टड्रिंक्सचा वाटा 60 टक्के होता, तो 40 टक्क्यांवर आला आहे.
दिल्ली, मुंबई आणि बंगळुरूमध्ये अ‍ॅसोचेमचे सर्वेक्षण
79% लोकांनी सॉफ्टड्रिंक्सऐवजी नॉन- कार्बोनेटेड ड्रिंक्सला पसंती दिली.
सॉफ्टड्रिंक्स आरोग्यदायी असल्याचे भासवण्यासाठी कंपन्यांचा युक्तिवाद
अमिताभ यांच्या खुलाशावर : अमिताभ मोठे कलावंत आहेत, आम्ही आमच्या ब्रँड अ‍ॅम्बेसेडरला स्वत:चे मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य देतो. आम्ही आरोग्याच्या सर्व मानकांचे पालन करतो. - पेप्सीचे निवेदन
कीटकनाशक मिश्रण, आरोग्याचा मुद्दा : आमची उत्पादने जगभर सारखीच आहेत. सुसज्ज प्रयोगशाळेत चाचण्या. - कोका-कोला आणि पेप्सी (2003 मध्ये)
यांनाही आहे आठ वर्षांच्या मुलीची प्रतीक्षा
पैशांसाठी पेप्सी आणि कोका-कोलाची जाहिरात करण्याची कलाकारांमध्ये स्पर्धाच लागली आहे. त्यापैकी काही जण तर वर्षभरापूर्वी कोका-कोला चांगला असल्याचे सांगत होते. आता पेप्सीसाठी काहीही म्हणण्याची त्यांची तयारी आहे. ताजे उदाहरण दीपिका पदुकोणचे आहे. 2009-10 मध्ये ती पेप्सीची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर होती, आता कोका-कोलाबरोबर करार करत आहे.
यापूर्वी आमिर खान, सचिन तेंडुलकर, अक्षयकुमार, हृतिक रोशन, ऐश्वर्या रॉय, करीना कपूरनेही दोन्ही कंपन्यांच्या जाहिराती केल्या आहेत.