आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पनामा पेपर्स: बिग बींच्या संकटात वाढ, बोर्ड मिटींगला होते हजर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पनामा पेपर लीक प्रकरणी अमिताभ बच्चन यांच्या संकटात वाढ होण्याची शक्यता आहे. पनामाची लॉ फर्म मोसेक फोंसेकाचे दस्तऐवज लीक झाल्यानंतर अमिताभ यांनी स्पष्टीकरण दिले होते. सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीची तयारी दाखवत त्यांनी म्हटले होते, की कोणत्याही कंपनीचा बोर्ड ऑफ डायरेक्टर नव्हतो. मात्र आता अशी माहिती समोर येत आहे, की ते फोनच्या माध्यमातून त्याच कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या मिटींगमध्ये सहभागी झाले होते. अमिताभ यांच्यावर आरोप आहे, की 5 हजारांपासून ते 50 हजार डॉलर दरम्याच्या कॅपिटल असलेल्या कंपन्यांचे डायरेक्टर होते.


- द इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, उपलब्ध रेकॉर्डनुसार अमिताभ डायरेक्टर या नात्याने या कंपन्यांच्या दोन बोर्ड मिटींगला 'कॉन्फरन्स टेलिफोन कॉल'द्वारे सहभागी झाले होते.
- बहामासच्या ट्रंप शिपिंग लिमिटेड आणि ब्रिटिश वर्जिन आयलंडच्या सी बल्क शिपिंग लिमिटेडमधील या मिटिंगमध्ये ते 12 डिसेंबर 1994 ला फोनद्वारे हजर होते.
- या मिटींगचे स्थळ "38/39, The Esplanade, St Helier, Jersey, Channel Islands, JE4 8SD" होते.
- दोन्ही कंपन्यांकडून प्रसिद्ध करण्यात आलेले सर्टिफिकेट ऑफ इनकम्बन्सी मध्ये अमिताभ बच्चन यांचे नाव डायरेक्टर आणि कंपनीचे सदस्य म्हणून आले होते.
- हे रेकॉर्ड्स जेद्दाच्या एका गुंतवणूक कंपनीकडून 1.75 मिलियन डॉलर कर्ज घेण्याशी संबंधीत आहेत.
- याचा उल्लेख मोसेक फोंसेकाच्या दस्तएवजातही आला होता.
- याच मिटींगमध्ये एक रिजॉल्यूशन पास करण्यात आले होते. त्यानुसार डालाह अलबारका इन्व्हेस्टमेंट कंपनी (डायको) च्या कॉन्स्टेलेशन शिप मॅनेजमेंट बहामासला दिलेल्या 1.75 मिलियन डॉलर कर्जाचा उल्लेख होता.
- हे कर्ज अमिताभ यांची कंपनी ट्रंम्प शिपिंगचे सर्व शेअर खरेदी करण्यासाठी देण्यात आले होते.
- कर्जाच्या बदल्यात एमव्ही सी ट्रंम्प नावाच्या जहाजाला तारण ठेवण्यात आले होते. हे जहाज अमिताभ संचालक असलेली ट्रंम्प शिपिंग लिमिटेड बहामास चालवत होते.
पुढील स्लाइडमध्ये,
काय दिले होते अमिताभ यांनी स्पष्टीकरण