आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महानायक अमिताभ बच्चन यांना \'पद्मविभूषण\' पुरस्कार प्रदान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नयी दिल्ली- बॉलीवूडचा महाअभिनेता अमिताभ बच्चन यांना पद्मविभूषण पुरस्काराने आज (बुधवारी) राष्‍ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते गौरवण्यात आले. राष्ट्रपतीभवनात सकाळी साडे अकरा वाजता हा सोहळा पार पडला. अभिताभ यांच्यासह बॉलिवूडचे ट्रेजडी किंग दिलीपकुमार, शास्त्रज्ञ डॉ.विजय भटकर, आगा खान, के. के वेणुगोपाल, प्रो. रामस्वामी श्रीनिवासन, वीरेंद्र हेगडे यांच्यासह 60 जणांना पद्म पुरस्कारांनी गौरवण्यात आले.

बच्चन परिवाराला मिळालेला हा सहावा पद्म पुरस्कार आहे. यापूर्वी अमिताभ यांचे वडील हरिवंशराय बच्चन यांना पद्मभूषण पुरस्कार, अभिताभ यांना पद्मश्री आणि पद्मभूषण, पत्नी जया यांना पद्मश्री आणि सून ऐश्वर्याला पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले होते.

याआधी 30 मार्चला 43 जणांना पद्म पुरस्कार देण्यात आले होते. त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, अकाली दलाचे प्रकाश सिंह बादल यांचा गौरव करण्यात आला. यंदा एकूण 103 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा,पद्म पुरस्कार स्विकारणार्‍या व्यक्तीची नावे...